Monday, 2 July 2012

इ त स्त स्त:


रविवारचे भाष्य दि. जुलै २०१२ करिता
 

गो-अभयारण्य
गो-अभयारण्य! म्हणजे गायींसाठी अभयारण्य. अभयारण्य सामान्यत: वन्य पशूंसाठी असते. आजकाल शिकारीचा शौक फार वाढला आहे. इतका की, वन्य पशूंच्या काही प्रजाती नष्ट होण्याचाही धोका उत्पन्न झाला आहे. म्हणून त्यांच्यासाठी स्थानोस्थानी अभयारण्ये आहेत. त्या अभयारण्यांमध्ये वन्य पशू निर्भयपणे हिंडू-फिरू शकतात.
पण गायींसाठी अभयारण्य! कल्पना विचित्रच वाटावी, अशी आहे. पण असे अभयारण्य तयार करण्यात येणार आहे. कुठे म्हणता? तर आपल्या शेजारच्या मध्यप्रदेशात. या राज्याच्या शाजापूर जिल्ह्यातील आगर या गावी यासाठी . प्र. सरकारने १३५० एकर भूमी आरक्षित केली आहे. प्रारंभी त्यासाठी कोटी रुपयांचा निधीही दिला आहे.
. प्र. गोवधबंदीचा कडक कायदा आहे. त्या सरकारने तो कायदा पारित केला आणि अलीकडेच त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. सरकारी अंदाजाप्रमाणे राज्यात सुमारे सव्वादोन कोटी गोवंशाची- म्हणजे गाई, बैल आणि वासरे- यांची संख्या आहे. पण त्यांच्यासाठी आवश्यक गोचर भूमी दिवसेंदिवस कमी होत आहे. भिन्न भिन्न प्रजातींच्या गायींच्या वंशवृद्धीसाठी सरकारने राज्याचे विभाग बनविले आहेत. त्या त्या ठिकाणी विशिष्ट गोवंशाच्या वृद्धीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. जसे हरयाणवी, थरपाकर, मालवी, नेमाडी . खरेच . प्र. सरकारचे या योजनेबद्दल आपण मुक्तकंठाने अभिनंदन केले पाहिजे.
***   ***   ***

मुबारक शेखची गोशाळा
मुंबई-पुणे मार्गावर कामशेत हे एक गाव आहे. या कामशेतवरून जरा उजवीकडे वळून आपण जाऊ लागलो, तर पावना नदीकडे आपले वाहन जाईल. या नदीच्या काठी आर्दव या नावाचे एक गाव आहे. या गावात आपण गेलात तर एका गोशाळेचे आपल्याला दर्शन होईल. ही गोशाळा चालविणार्या व्यक्तीचे नाव मुबारक शेख आहे. ते आणि त्यांचे वडील हाजी अब्बास कासम यांची ती गोशाळा आहे. मुबारक शेख ३८ वर्षांचे आहेत. ते आपल्या गोसेवेचे श्रेय आपल्या वडिलांना देतात. कारण ही गोशाळा त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली आहे. सध्या त्यांच्या गोशाळेत २९ गायी आहेत. अनेक गरीब शेतकरी म्हातार्या गाईंचे पालन करण्यास असमर्थ असतात. ते खाटकाला गाई विकतात. मुबारक शेखच्या वडिलांनी त्या गाई खरेदी करून, त्यांचे पालन करण्याचे ठरविले. सुरवातीला पाच गाई त्यांनी प्राप्त केल्या. आर्दव एका छोट्याशा नदीच्या काठावर वसले आहे. त्या नदीकाठच्या बिगरशेती जमिनीवर या गायी मोकळ्या सोडल्या जातात. मुबारक शेख यांच्या घरची माणसं त्यांच्याकडे लक्ष ठेवतात. त्यांना दरमहा ६० हजार रुपये खर्च येतो. तेवढा खर्च झेपण्याइतकी या कुटुंबाची संपन्नता नाही. पण ते कृतज्ञतापूर्वक सांगतात की, सोलापूरचे छगनलाल कंवारा, लोकेश जैन आणि बेकरीवाले मेहबूब आलम यांच्या बरोबरच मुंबईचे राघव पटेल, यांच्याकडून त्यांना पुरेशी मदत मिळते.
परंतु, आपली गोशाळा चालविणे एवढ्यापुरतेच मुबारकभाईचे काम मर्यादित नाही. गोरक्षणासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी त्यांनी मातृभूमि दक्षताया नावाची एक संस्था स्थापन केली आहे. महाराष्ट्र सरकारकडे या संस्थेच्या काही मागण्या आहेत. पण अद्यापि तरी सरकारकडून अनुकूल प्रतिसाद मिळालेला नाही.
मुसलमान समाजातील या गोभक्ताबद्दल कुणाला अभिमान वाटणार नाही? पण मुबारकभाईचे कार्य अपवादात्मकही समजण्याचे कारण नाही. राजस्थानातील जोधपूरजवळ अंजुमन इस्लामया संस्थेकडून फार मोठी गोशाळा चालविली जात आहे.
(‘पांचजन्य’, १७ जून २०१२ च्या अंकावरून)
***   ***   ***

संघाची रीत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्याच्या कार्यव्यवस्थेसाठी संपूर्ण भारतात ३९ प्रांत आहेत. त्यातला एक मालवा प्रांत. हा वेगळा प्रांत अलीकडेच म्हणजे सुमारे एक वर्षापूर्वी तयार करण्यात आला. ज्याला शासकीय मध्यप्रदेश राज्य म्हणून संबोधिले जाते, त्याचे संघाच्या दृष्टीने तीन प्रांत आहेत. महाकोशल, मध्य भारत आणि मालवा. एक वर्ष पूर्वीपर्यंत, ‘मालवाचा अंतर्भाव मध्य भारतातच होत होता.
या मालवा प्रांताचा प्रथम वर्ष प्रशिक्षणाचा संघ शिक्षा वर्ग या वर्षी शाजापूर येथे संपन्न झाला. त्यात मालवा प्रांताच्या संघदृष्ट्या २६ जिल्ह्यांमधून (सरकारीदृष्ट्या १५ जिल्हे) ५०२ शिक्षार्थी सामील होते. त्यात २७८ विद्यार्थी, ८० शेतकरी आणि १४४ व्यवसायी होते. शिवाय, ५३ शिक्षक आणि व्यवस्थेसाठी ७० स्वयंसेवक. आपण विचाराल की हा सारा तपशील देण्याचे कारण काय? प्रत्येकच प्रांतात दरवर्षी २० दिवस मुदतीचे असे वर्ग होत असतात. मालवाचे वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य हे आहे की, सुमारे सव्वासहाशे लोकांसाठी जे भोजन तयार केले जात असे, त्यात पोळ्या केल्या जात नसत. म्हणजे काय? दक्षिणेतल्या संघ शिक्षा वर्गांप्रमाणे मालव्यातही शिक्षार्थ्यांना केवळ भाताचे भोजन घ्यावे लागत होते काय? नाही. शाजापूरची कुटुंबे रोज, या सव्वासहाशे स्वयंसेवकांकरिता पोळ्यांची व्यवस्था करीत असत. या व्यवस्थेत ११०० कुटुंबेहभागी होती आणि ती कुटुंबे रोज ११ हजार पोळ्या या स्वयंसेवकांसाठी तयार ठेवीत असत. एक दिवस नाही. संपूर्ण वीस दिवसांसाठी. सामाजिक अभिसरणाची ही संघाची रीत आहे. नागपूरच्या जुन्या स्वयंसेवकांना आठवत असेल की, १९६२ साली, जेव्हा रेशीमबागेतील स्मृतिमंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा झाला, तेव्हा बाहेरगावांहून आलेल्या सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांची व्यवस्था नागपूरच्या स्वयंसेवकांच्या घरी करण्यात आली होती. पण ती फक्त एक-दोन दिवसांची बात होती. शाजापूरचे समाजनिबंधन २० दिवसांचे होते.
***   ***   ***

एक विलक्षण ग्रूव्ह
ग्रूव्हहा इंग्रजी शब्द आहे. त्याचा अर्थ खोलगट जागा किंवा बोगदा असा शब्दकोश सांगेल. पण इन् ग्रूव्हया वाक्प्रचाराचा रूढार्थ मात्र वेगळा आहे. तो आहे फॅशनेबल, अद्यावत् अड्डा. जसा एखादा नाईट क्लब. रात्रभर बेधुंद मौजमजेचे स्थान. अर्थात् तरुणांचे. खरे म्हणजे तरुण शौकिनांचे मनोरंजन करणारे स्थान.
अर्जेंटिना नावाच्या दक्षिण अमेरिकेतील देशाची राजधानी असलेल्या ब्यूनास आयर्स या शहरातही ग्रूव्हअसणारच. आहेतही. त्या देशात भारताचे जे राजदूत आहेत, त्यांचे नाव विश्वनाथन्. त्यांनी भारतीय पर्यटकांना सल्ला दिला आहे की, तुम्ही ब्यूनास आयर्सला आलात तर एका ग्रूव्हला म्हणजे नाईट क्लबला अवश्य भेट द्या.
कुणालाही वाटेल की या विश्वनाथन्ला हा आगाऊपणा करण्याचे प्रयोजन काय? त्याचे प्रयोजन आहे. कारण हा एक आगळावेगळा नाईट क्लब आहे. येथे शृंगारचेष्टांचे नाचगाणे नाही. मद्यपान नाही. संगीत आहे. पण ते तालासुरांचे आहे. आणि त्यांचे बोल असतात, ‘राधारमण हरि बोलो’, ‘जय जय रामकृष्ण हरे’, ‘जय जय शिव शंभोआणि जय गुरू ओम्’. या सर्व संस्कृत रचना आहेत. त्यांच्या तालावर तरुण-तरुणी इथेही नाचतात. पण भक्तिभावाने. किती असते म्हणता त्यांची संख्या? तर तब्बल सात-आठशे.
पानासाठी मद्य नसते. शीतपेये असतात आणि भोजन असते शुद्ध शाकाहारी. आणि आणखी मौज म्हणजे या क्लबमध्ये एक योगगुरूही येतात. ते उपस्थितांना योगासनांविषयी माहिती देत असतात.
हा क्लब २००८ मध्ये सुरू झाला आहे आणि त्याची सदस्यसंख्या हजारोत आहे. या क्लबने आपला आगळावेगळा आनंद-अनुभव स्वत:च्या देशापुरताच मर्यादित ठेवला असेही नाही. त्यांनी दक्षिण अमेरिकेतीलच ब्राझील, चिली, उरुग्वे, पॅराग्वे इत्यादि देशातील लोकांनाही त्याचा लाभ करून दिला आहे. ही संस्कृती आता अधिकाधिक पसरत आहे. राजदूत विश्वनाथन् यांनी हा सल्ला का दिला, हे आता समजले ना!
(‘विकल्पवेध’, १६ ते ३० जून २०१२ च्या अंकावरून)
***   ***   ***

एल. . डी. दिवे
सध्या ऊर्जाबचतीच्या आवश्यकतेवर सर्वत्र भर दिला जातो. वीज निर्माण करण्यासाठी हजारो टन कोळसा जाळला जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. यावर काही उपाय आहे काय? आहे. तो म्हणजे एल. . डी.चे दिवे
एल. . डी. म्हणजे नेमके काय आहे? एल. . डी. म्हणजे लाईट ईमिटिंग डायोड. अशा डायोडपासून विद्युत प्रकाश मिळवता येतो. हे तंत्रज्ञान अलीकडे प्रगत झाले आहे. यापूर्वी असे एल. . डी. दिवे इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील पथदर्शक म्हणून वापरण्यात येत असत. असे पथदर्शक दिवे अतिशय कमी प्रकाश देत असत. तथापि प्रगत तंत्रज्ञानाने अशा एल. . डी. दिव्यांच्यापासून खूप प्रमाणात प्रकाश मिळवणे साध्य झाले आहे. एल. . डी. तयार करताना फॉस्फरस आणि ईपॉक्सी यांचे मिश्रण ठराविक प्रमाणात घेऊन ते एका छोट्याशा कपमध्ये ठेवण्यात येते या कपला धन ऋण असे ध्रुव दिलेले असतात. ही संपूर्ण यंत्रणा एका छोट्या म्हणजेच मि. मि., मि. मि., १० मि. मि. इतक्या लहान काचेच्या निर्वात बल्बमध्ये ठेवलेली असते. या मिश्रणातून विद्युत प्रवाह सोडला असता सदरचे मिश्रण प्रकाश उत्सर्जित करते आपल्याला प्रकाश मिळतो. बाहे पडणारा हा प्रकाश हा फॉस्फरसच्या अंतर्गत मूलद्रव्यांच्या प्रमाणावर, कणांच्या आकारावर, तसेच वापरलेल्या ईपॉक्सीवर अवलंबून असतो. एल. . डी.पासून वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश मिळवता येतो. एल. . डी. दिव्यांच्या वापरातून मिळणार्या फायद्यांचा, इमारत बांधकामामध्ये वापर केल्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत करणे शक्य होणार आहे. एल. . डी. दिव्यांचे आयुर्मान हे सुमारे लाख तास असून सर्वसाधारणपणे वापरात असणार्या या सी. एफ. एल. दिव्यांच्या (ज्यांचे आयुर्मान ३५०० ते ९००० तास आहे) दसपट जास्त आहे. यामुळे या दिव्यांचा वापर सुरुवातीलाच म्हणजे इमारत वापरात आणल्यापासून रोज सुमारे तास केला तर जोपर्यंत अपघात घडत नाही तोवर अथवा किमान २५ वर्षे तरी दिवे बदलावे लागणार नाहीत. त्यामुळे आपोआप आवर्ती खर्चात बचत होणार आहे. तसेच पर्यायाने टाकाऊ वस्तूंच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होणार असल्याने पर्यावरण संरक्षणासाठी त्याचा उपयोग होईल. एल. . डी. दिव्यांच्या वापरातून कोणत्याही प्रकारची उष्णता बाहेर पडत नसल्याने त्याचा अंतिम परिणाम वातानुकूल यंत्राच्या वापरातील ऊर्जाबचतीमध्ये होऊ शकेल. सर्वसाधारणपणे रंगीत प्रकाश मिळविण्याकरिता वेगवेगळ्या फिल्टर्सचा वापर करावा लागतो. इमारतीच्या अंतर्गत सजावटीमध्ये रंगीत प्रकाश मिळविताना बहुधा रंगीत काच फिल्टर म्हणून वापरली जाते. यामध्ये प्रकाशक्षय होतो. स्रोतापासून निघालेली संपूर्ण ऊर्जा वापरात आणता येत नाही. एल. . डी. तंत्रज्ञानामुळे हा दोष काढून टाकणे शक्य झाले आहे. मूलत: फॉस्फरस ईपॉक्सीचे जे मिश्रण कपमध्ये साठवण्यात येते त्याच्या गुणधर्मावर आधारित प्रकाश मिळवता येतो. त्यामुळे विशेषत: अंतर्गत सजावटीमध्ये जेथे विशिष्ट वस्तूवर जास्त तीव्र प्रकाश असणे ही गरज असते, तेथे तशा प्रकारचा रंगीत प्रकाश आवश्यक त्या तीव्रतेनुसार कमी ऊर्जेमध्ये देता येणे शक्य आहे. एल. . डी. दिव्यांच्या वापरामध्ये त्वरित संपूर्ण तीव्रतेचा प्रकाश मिळवता येतो. फिलेमंट दिव्यांमध्ये, दिवा चालू केल्यावर विशिष्ट कालावधी गेल्याशिवाय संपूर्ण तीव्रतेचा प्रकाश मिळत नाही. हा दोष एल. . डी. दिव्यांच्या वापरामध्ये दूर करता येतो. तसेच संपूर्ण यंत्रणा ही अत्यंत कमी पोटेंशियल डिफरन्सवर चालत असल्याने या दिव्यांच्या वापरामध्ये फिलेमंट दिव्यांप्रमाणे व्होल्टेजमधील बदलानुसार प्रकाशाची तीव्रता कमी जास्त होत नाही कायमपणे विशिष्ट तीव्रतेचा प्रकाश मिळविता येतो. फ्लरोसेंट दिव्यामध्ये पार्याचा वापर करण्यात येतो. उलट एल. . डी. दिव्यांच्या तंत्रज्ञानात पार्याचा वापर अजीबात करण्यात येत नाही. तसेच त्यामध्ये कोणतेही हालचाल करणारे सुटे भाग नसतात. त्या दिव्यांपासून शरीराला अपायकारक असे कोणतेही वायू उत्सर्जित केले जात नाहीत. त्यामुळे एल. . डी. दिवे हे पर्यावरणाला पोषक आहेत. आज सरकारी कार्यालये, नगरपालिका, महानगरपालिका, अतिथिगृहे बघा. जरुरीपेक्षा काही पटीने अधिक विजेची उधळपट्टी चाललेली दिसते. तिथे जरुरीपेक्षा किती तरी अधिक ट्यूबचा प्रकाश उपलब्ध असतो. अशा सर्व ठिकाणी ट्यूब काढून एल. . डी. दिवा लावला तर विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. एल. . डी. दिव्यांचा ल्यूमेन आऊटपुट प्रति वॅट हा सी. एफ. एल. लॅम्पपेक्षा किती तरी प्रमाणात जास्त असल्याने एल. . डी. दिव्यांचा कार्यक्षमतेने वापर केल्यास इमारतींच्या ऊर्जावापरामध्ये प्रचंड बचत होणार आहे.
भविष्यात एल. . डी. तंत्रज्ञानाचा बांधकाम क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार अधिक उपयोग होऊ शकतो. आतापासूनच या दिव्यांबाबत जास्तीत जास्त माहिती समाजातील प्रत्येक घटकांस देऊन प्रत्येकाने दैनंदिन वापरात सध्या उपयोगात असणारे दिवे बदलून एल. . डी. दिव्यांचा वापर करणे फायदेशीर ठरणार आहे. एल. . डी. दिव्यांच्या तंत्रज्ञानामुळे सी. एफ. एल. दिव्यांच्या वापराकरिता जेवढी ऊर्जा लागते त्याच्या २० टक्के इतक्या कमी ऊर्जेचा वापर करून देखील सुखकारक प्रकाश मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधणीचा आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेपासूनच किती क्षमतेचा प्रकाश कोणत्या ठिकाणी आवश्यक आहे, दिवसातून किती तास त्या जागेचा वापर होणार आहे, त्यानुसार अंतर्गत विद्युतीकरणाची आखणी वाढते ऊर्जेचे दर टंचाई यावर उपाययोजना करता येईल आवर्ती खर्चात तसेच आवर्ती ऊर्जा वापरात प्रचंड प्रमाणा बचत होई.
(साप्ताहिक विजयंतसांगलीच्या जूनच्या अंकावरून)


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ३०-०६-२०१२
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment