Tuesday, 14 January 2014

आम आदमी पार्टीचे आव्हान


आम आदमी पार्टीचे (आआपा) सरकार दिल्लीत सत्तारूढ झाले आहे. या सरकारने विश्‍वासमतही प्राप्त केले आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला. काँग्रेस पक्ष किती दिवस पाठिंबा देईलयाविषयी लोकांच्या मनात संभ्रम असणे स्वाभाविक आहे. याला कारण काँग्रेस पक्षाचा पूर्वेतिहास आहे. आणिबाणीच्या कालखंडानंतर श्री मोरारजी देसाई यांचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने चौधरी चरणसिंग यांना पाठिंबा देऊन त्यांना प्रधानमंत्रिपदावर आरूढ केले होते. पण लगेच त्यांचा पाठिंबा काढून घेतला. तोही इतक्या तडकाडकीने कीबिचारे चरणसिंग लोकसभेत उपस्थितही होऊ शकले नाहीत. त्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या नेत्या होत्या. चौधरी चरणसिंग यांच्या या अल्पजीवी मंत्रिमंडळात श्री यशवंतराव चव्हाण उपप्रधानमंत्री होते. यशवंतराव चाणाक्ष राजकीय पुढारी. मला आश्‍चर्य वाटले कीत्यांनी श्रीमती गांधींच्या  शब्दावर विश्‍वास कसा ठेवलाएकदा दिल्लीला मी यशवंतरावांना भेटलो आणि त्यांना हाच प्रश्‍न विचारला होता. यशवंतरावांचे प्रामाणिक उत्तर होते, ‘‘इतक्या लवकर पाठिंबा काढला जाईलयाची कल्पना आली नव्हती!’’

कॉंग्रेसचा व्यवहार
पण हे अपवादात्मक उदाहरण नाही. देवेगौडाइंद्रकुमार गुजरालचंद्रशेखर यांची सरकारे काँग्रेसच्या पाठिंब्यावरच सत्तारूढ झाली होती. पण कोणतेही सरकार वर्षदीड वर्षापेक्षा अधिक काळ टिकले नाही. कारण काँग्रेसनेस्वत:हून दिलेला पाठिंबा काढून घेतला. यासाठी एखादे क्षुल्लक कारणही पुरेसे ठरले होते. त्यामुळे केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील आआपाचे सरकार फार काळ टिकेल असे नाही. बहुधा लोकसभेची निवडणूक जाहीर होताच आआपाच्या सरकारला खाली खेचले जाईल.
परंतुआआपाचे आकर्षण आणि शक्ती त्यामुळे कमी होईल असे मला वाटत नाही. उलट त्या पक्षाला जनतेची अधिक सहानुभूती मिळेलआणि लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना त्याचे शक्तिशाली आव्हान राहील.

दिल्लीचा महिमा
हे खरे कीआआपाचे सरकार राजधानी दिल्लीत स्थापन झाल्यामुळेचत्याला एवढी प्रसिद्धी मिळाली आणि पुढेही मिळत राहील. आआपाचे सरकार  तामीळनाडूत किंवा झारखंडमध्ये सत्तारूढ झाले असतेतर त्याची एवढी वाहवा किंवा चर्चा झाली नसती. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हाकिंवा तामीळनाडूमध्ये द्रमुक अथवा अद्रमुक यांचे सरकार जेव्हा सत्तारूढ होते तेव्हात्याची अशी चर्चा झाली नव्हती. पण दिल्लीत सत्ता स्थापन झाली की जणू काही संपूर्ण भारतावर सत्ता स्थापन झाली असा भास निर्माण होतो. मोगल़ सम्राट बाबर याची सत्ता दिल्ली व त्याच्या परिसरातच सीमित होतीपण त्याला आजही हिंदुस्थानचा सम्राट म्हणूनच उल्लेखिले जाते. दिल्लीचा हा हिमा आहेहे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळेदिल्लीत सरकार बनवून एक आठवडाही होत नाहीतोच अरविंद केजरीवाल हे भारताचे भावी प्रधानंत्री आहेतअशी स्वप्नचित्रे रंगविली जाऊ लागली आहेत.
हे स्वप्न प्रत्यक्षात उतरते किंवा नाहीकिंवा किती प्रमाणात उतरतेहे सजण्यासाठीफार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. येत्या पाच हिन्यांतच त्याचा निर्णय लागेल.
पण याचा अर्थ अरविंद केजरीवाल आणि त्यांची आआपा यांची शक्ती कमी लेखणे किंवा तिची उपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. हे खरे की दिल्ली म्हणजे सारा भारत नव्हे. हेही खरे की आआपाची शक्ती सध्या तरी केवळ शहरी भागापुरतीच र्यादित आहे. भारताचा सुमारे 70 टक्के भाग ग्रामीण आहेआणि या ग्रामीण भागात आआपाचे लोण अद्यापि पोचलेले नाही आणि नजीकच्या काळात ते पोचण्याची शक्यताही नाही. परंतु शहरी भागात काँग्रेस व भाजपा या दोन्ही मोठ्या पक्षांना आआपाचे आव्हान राहणार आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आआपाने काँग्रेसच्या पारंपरिकतदारांध्ये फार मोठे खिंडार पाडले. त्यामुळेच काँग्रेस पक्ष तिसर्‍या क्रमांकावरफेकला गेलाआणि 70 पैकी क्त 8 जागा जिंकू शकला. पण आआपाने भाजपाकडे जाऊ शकणारी तेही काही प्रमाणात स्वत:कडे वळविण्यात यश प्राप्त केलेहेही लक्षात घेतलेच पाहिजे. अन्यथा भाजपाला निदान 40 जागा मिळून तो पक्ष सत्तारूढ झाला असता. दिल्लीतील आआपाच्या यशानेअन्य मोठ्या शहरांतही आआपाविषयी आपुलकी आणि सहानुभूती निर्माण झाली आहे. अनेक तटस्थ लोक तसेच राजकारणात रस असलेले पण कोणत्याही कारणास्तव बाजूला सारले गेलेले लोकआआपात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे तरुण वर्गातही त्या पक्षाविषयी आपुलकीचा अंकुर फुटला आहे.

ग्रामीण क्षेत्राचे वैशिष्ट्य
या नव्या मानसिकतेचा टका जेवढा काँग्रेसला बसेलत्यापेक्षा अधिक जोरदार टका भाजपाला बसू शकतो. कारणशहरी भागात काँग्रेसची शक्ती आणि प्रभाव ओसरू लागलेला आहे. ही शक्ती आणि प्रभाव भाजपाकडे वळू लागलेला आहे. भाजपाचे प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या सभांना लोटत असलेली प्रचंड गर्दीहे त्याचे उत्त लक्षण आहे. या शहरी भागात भाजपा आज तरी अग्रस्थानी आहे. त्यामुळेआआपाचा प्रभाव भाजपाचेच जास्त नुकसान करू शकेलमाझ्या कल्पनेप्रमाणे शहरी भागात भाजपा आणि आआपा यांच्यातच खरी लढत होईल. दिल्लीप्रमाणे काँग्रेस तिसर्‍या स्थानावर फेकली जाईल. ग्रामीण भागात मात्र काँग्रेस व भाजपा यांच्यातच मुख्य लढत राहील. आआपा तेथेही उमेदवार उभे करीलच. पण भौगोलिक दृष्ट्या विस्तारलेल्या ग्रामीण क्षेत्रात आवश्यक तेवढे कार्यकर्तेसाधने व धनआआपाला मिळणे सोपे नाहीआणि कार्यकर्त्यांच्या पुरेशा संख्येच्या अभावी या क्षेत्रात निवडणूक जिंकणे सोपे नाही. काँग्रेसचे संघटन नसलेतरी कार्यकर्ते आहेत. भाजपाकडे संघटनही आहे व कार्यकर्तेही आहेत. त्यामुळेया भागात मुकाबला भाजपा व काँग्रेस यांच्यातच राहील.

परंतु भाजपाच्या शक्तीचा मोठा आधार शहरी भाग आहेआणि या भागातच आआपाआपली शक्तीही पणाला लावणार आहे. भाजपातील अनुभवी पुढारी ही वस्तुस्थिती अवश्य ध्यानात घेतीलचआणि त्या दृष्टीने ते आपली रणनीती आखतीलयाविषयी शंका घेण्याचे कारण नाही. मात्र यासाठी आआपावर केवळ आरोप करणे पुरेसे ठरणार नाही. ज्या काँग्रेसवर आआपाने भ्रष्टाचारग्रस्त पार्टी म्हणून आरोप केलेत्याच काँग्रेसचा पाठिंबा घेऊन तो पक्ष दिल्लीत सत्तेवर आला हे खरे असलेतरी या आरोपात तेवढा द नाही. हे ध्यानात घेतले पाहिजे कीआआपाने काँग्रेसकडे पाठिंबा मागितला नव्हता. काँग्रेसने तो स्वत:हून दिला. पण तो प्राप्त झाल्यानंतरही केजरीवाल यांनी सत्तेवर आरूढ होण्याची घाई केली नाही. चरणसिंगदेवेगौडागुजराल यांच्या प्रमाणे ते त्या पाठिंब्याला भुलले नाहीत. त्यांनी जनतेत जाऊन कौल मिळविला आणि त्यानंतर त्यांनी सरकार बनविलेत्याचप्रमाणे आआपाला परदेशातून पैसा मिळतोयामुद्याच्या प्रचाराचाही परिणाम मर्यादितच राहणार आहे. हे खरेच आहे की,केजरीवाल यांच्या कबीर’ या एनजीओला फोर्ड फाऊंडेशनकडून भरपूर पैसामिळाला. तो त्यांनी दिल्लीच्या निवडणुकीसाठी वापरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी चालू असल्याची माहिती आहे. तिचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतरच त्याच्या परिणामांची चर्चा करता येईल. पण या दोन नकारात्मक मुद्यांचाच धोशा लावून आआपाचा वारू रोखणे शक्य होईलअसे ला वाटत नाही. भाजपानेतदान केंद्रश: (बूथवाईज) जी संघटनप्रक्रिया सुरू केली आहे,तिच्याकडे लक्ष पुरवून ती व्यवस्था अधिक जबूत केली पाहिजे. याशिवाय,घोषणापत्रात कोणते मुद्दे राहतातहेही हत्त्वाचे आहे. पण त्यांची यथार्थ चर्चा घोषणापत्र प्रकाशित झाल्यावरच केली जाऊ शकेल. ला येथे आवर्जून हे नमूद करावयाचे आहे कीआआपाच्या आव्हानाचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे,त्याला कमी लेखून किंवा उपेक्षून कार्यभाग सिद्ध व्हावयाचा नाही.


-मा. गो. वैद्य
नागपूर,
दि. 06-01-2014

2 comments:

  1. आदरणीय ,
    बाबा .... सादर प्रणाम !
    विषय पाहिजे त्या प्रमाणात आवडला नाही .
    आ आ पा विषयी विषयच हाताळन्याची गरजच नव्हतो .
    असो नियमित लिखाण दयाल अशी आशा आहे .
    स्वास्था विषयी काळजी घ्यावी .
    शेष कुशल ...आपला आशीर्वाद असावा .
    आपला
    महेशचंद खत्री

    ReplyDelete
  2. AK-49 has shown his colors now. he is no more than a publicity stunt who ran away fom Delhi government to fight lok sabha elections. AAP has no future. It just played with people's sentiments for some time and gained popularity. It will sunk because they have no vision, no agenda apart from blaming others.

    ReplyDelete