Saturday 21 April 2012

इ त स्त त:


रविवारचे भाष्य दि. २२-०४-२०१२ करिता


परिवर्तनाची शुभ चिन्हे

) गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या २७ तारखेला, पश्चिम उत्तर प्रदेशातील ४० ख्रिस्ती कुटुंबांनी पुनश् आपल्या हिंदू धर्मात प्रवेश केला. ही सर्व, मूळची दलित कुटुंबे होती. परावर्तनात आता तसे नावीन्य राहिलेले नाही. पण नावीन्याचा भाग पुढे आहे. या ४० कुटुंबांपैकी, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला पौरोहित्याचे शिक्षण देण्यात येणार आहे. कालबाह्य झालेल्या भाषेचा प्रयोग करावयाचा झाला, तर त्या सर्वांना ब्राह्मणत्व लाभणार आहे. त्यांची एवढी तयारी करून दिली जाणार आहे की, सर्व धार्मिक सामाजिक कार्यांसाठी त्यांना योग्य आणि आदरणीय समजले जाईल.

***

) केरळमधील त्रावणकोर देवस्वम् बोर्डने गेल्या दोन महिन्यांमध्ये शंभर पुजार्यांना प्रशिक्षित केले आहे. या बोर्डाच्या व्यवस्थापनाखाली १२०० मंदिरे आहेत. त्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा नीट व्हावी, यासाठी हे बोर्ड पुजार्यांना कर्मकांडाचे प्रशिक्षण देत असते. नव्याने शंभर पुजारी प्रशिक्षित करून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यापैकी ५० ब्राह्मण नाहीत. सहा महिन्यांपूर्वी देवस्वम् बोर्डाने पुजार्यांची भरती करण्याचा उपक्रम सुरू केला. शेकडो अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या. त्यातले १०० निवडले. त्यात ५० टक्के ब्राह्मण नव्हते. पुजारी बनण्यासाठी जातीचे बंधन पाळावयाचे नाही, ही या बोर्डाची नीती आहे. मात्र, उमेदवाराला थोडे संस्कृत आणि थोडे तंत्रशास्त्र अवगत असले पाहिजे. कृष्णन् नंबुद्री केरळातील तंत्र विद्यापीठाचे महासचिव आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेणार्या समितीचे ते एक सदस् आहे. ते म्हणाले की, ‘‘आमची एकच अट होती की, तो मल्याळम् भाषी हिंदू असावा. जन्माने ब्राह्मण नसलेल्या अनेकांनी योग्य रीतीने मंत्र म्हणून दाखविले; आणि त्यांना पूजेच्या तंत्राचेही ज्ञान होते. म्हणून आम्ही त्यांचीही निवड केली.’’

सातऐवजी आठ फेरे

) विवाहविधीत अग्नीभोवती सात फेरे घालण्याची उत्तर भारतात प्रथा आहे. आपल्याकडे सप्तपदीचा विधी आहे. त्यासारखाच हाही विधी. परंतु, बुंदेलखंडातील एका समाजाने, सातऐवजी आठ फेरे घालण्याची प्रथा सुरू केली आहे. कशासाठी म्हणता?- तर कन्येचा जन्म झाला, तर त्याचा आनंद मानण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी. समाजाचे नाव आहे गहोई-वैश्य समाज. या समाजाच्या कर्त्याधर्त्यांच्या हे ध्यानात आले की, त्यांच्या समाजात, मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येचे प्रमाण फार कमी आहे. त्यांनी, या समस्येचा विचार करण्यासाठी, चक्क आपल्या समाजाची एक सभाच बोलाविली आणि सर्वानुमते ठराव पारित करून एक फेरा वाढविला आणि नवदम्पतीने ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे, हे ठरविले.
१२ फेब्रुवारी २०१२ ला, या ठरावानुसार एक विवाहविधी संपन्न झाला. राधेश्याम बिलैया यांनी या बाबतीत पुढाकार घेतला. श्री बिलैया चांगले सुशिक्षित आहेत. महाराजपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. वधूचे नाव हर्षा’. ती मुंबईच्या एका खाजगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते; आणि वर आहे समीर. तो एका मोबाईल फोन कंपनीत नोकरी करतो. आपल्या समाजात नवीन प्रथा सुरू करण्याचा मान आपल्याला मिळाला, याचा या दोघांनाही आनंद आहे.
या समाजाचे प्रमुख श्री नारायण रुशिया यांनी सांगितले की, ‘‘या गंभीर सामाजिक समस्येवर विचार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरविले की, मुलीच्या जन्माबद्दल खंत बाळगता, ती एक आनंदाची समाजहिताची घटना आहे, असे आपण समजले पाहिजे; आणि यासाठी विवाहविधीतच त्याची प्रतिज्ञा एक फेरा आम्ही अंतर्भूत केला. . प्र.चे मुख्य मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रस्तुत केलेल्या कन्या वाचवाअभियानाने आम्हाला प्रेरित केले आणि सुमारे साडेसहाशे कुटुंबांचा अंतर्भाव असलेल्या आमच्या समाजाने त्याला मान्यता दिली.’’

आणि हे चित्र!

आपल्या भारताच्या ईशान्य कोपर्यात मिझोराम नावाचे एक छोटेसे राज्य आहे. पूर्वी, मिझोराम हा आसाम राज्याचाच एक जिल्हा होता. त्या जिल्ह्यात ९५ टक्के लोक ख्रिस्ती आहेत. हिंदू आणि हिंदुत्व यापासून दूर गेले की वेगळेपणाची भावना निर्माण होते, असे आपला इतिहास सांगतो. मिझोराममधील ख्रिस्ती याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनी मिझोरामचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केले. मिझो नॅशनल फ्रंटअसे या आंदोलनकर्त्या संघटनेचे नाव आहे. मिझोहे एक वेगळे राष्ट्र आहे, असा त्यांचा दावा होता. पण सरकारने हे आंदोलन, शक्तीचा उपयोग करून शांत केले. मात्र भारताच्या अंतर्गतच, एक वेगळे राज्य म्हणून त्याला मान्यता दिली. २० फेब्रुवारी १९८७ ला मिझोराम हे वेगळे राज्य बनले. सध्या मिझो नॅशनल फ्रंटहा तेथे एक राजकीय पक्ष आहे.
२००१ च्या जनगणनेप्रमाणे मिझोरामची लोकसंख्या पुरती लाखही नाही. यात बॅप्टिस्ट चर्चला मानणार्यांची बहुसंख्या आहे. बॅप्टिस्टचर्च हे प्रॉटेस्टंट चर्च आहे. पण कडवेपणाच्या बाबतीत ते रोमन कॅथॉलिकांच्या फार मागे नाहीत.
प्रथमच या चर्चने एका महिलेला दीक्षा दिली. या महिलेचे नाव आहे डॉ. आर. एल. हुनूनी. बायबलचा तिचा खास अभ्यास आहे. मिझोरामची राजधानी असलेल्या ऐजवाल शहरातील ऍकेडमी ऑफ इंटेग्रेटेड ख्रिश्चन स्टडीज्या संस्थेची ती प्राचार्या आहे. ११ मार्च २०१२ ला तिला दीक्षित करण्यात आले. पण त्या बरोबरच हेही सांगण्यात आले की तिला पॅस्टरहोता येणार नाही. पॅस्टरम्हणजे आपल्या भाषेत धर्मगुरू’. सरळ पुरोहित म्हणा ना!
हुनूनीला दीक्षा देण्याचा मामला वर्षभर प्रलंबित होता. गेल्या वर्षीच, हुनूनीला दीक्षा देण्याच्या प्रस्तावाला, बॅप्टिस्ट चर्चच्या असेंब्लीने नकार दिला होता. वर्षभरानंतर थोडी प्रगती झाली. हुनूनी दीक्षितझाली. पण तिला पॅस्टरचे पद मात्र मिळावयाचे नाही.
तथापि, या वहिवाटीला कारण केवळ ख्रिस्ती संप्रदाय आहे, असे समजण्याचे कारण नाही. ख्रिस्ती झाल्यानंतरही जनजातींच्या जुन्या- जुनाट म्हणा- परंपरा सुटत नाहीत. मिझो जमातीत पुरुषप्रधानता आहे. त्याचेच प्रतिबिंब चर्चच्या रचनेत आणि व्यवहारात पडले आहे, असेच समजणे योग्य.

फिरता दवाखाना

आपल्या गडचिरोली जिल्ह्याची ही कहाणी आहे. नक्षलप्रभावित जिल्हा अशी गडचिरोलीची ख्याती संपूर्ण देशात आहे. अशा या दुर्गम नक्षलग्रस्त भागात डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीएक फिरता दवाखाना चालविते. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि मूलचेरा ही नावे विदर्भवासीयांच्या परिचयाची झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यातील काही गावे या सेवा समितीने निवडलेली आहेत. एटापल्ली तालुक्यातील पेठा, मूलचेरातील किश्तापूर, अहेरी तालुक्यातील नागुलवाही, कोलापल्ली, गुड्डीगुदाम ही त्यातली काही गावे. भामरागड तालुक्यातीलही काही गावांची निवड करण्यात आली आहे.
सेवा समितीने प्रथम एक जीप घेऊन, तिच्यात औषधे ठेवून आपले कार्य सुरू केले. पण आता समितीजवळ एक ऍम्बुलन्स आली आहे. चंद्रपूरचे भाजपा खासदार श्री हंसराज अहिर यांच्याकडून ही ऍम्बुलन्स कार समितीला मिळाली आहे. अहेरीचे डॉ. सुरेश डंबोले, ही सर्व व्यवस्था बघतात. प्रत्येक ठरलेल्या केंद्रात, ठरलेल्या दिवशी, औषधे घेऊन ही ऍम्बुलन्स जाते आणि त्या दुर्गम भागातील जनतेची सेवा करते. सेवा समितीला जनतेकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पेठा येथे स्थानिक जनतेने, आपल्या श्रमदानाने, दवाखान्याची एक इमारतच उभी केली आहे.

दु:खशमनाचा उपाय

तामीळनाडू राज्यात, तंजावर नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यातील कोलकत्तूर या गावी कनकसभाई या नावाचे गृहस्थ होमिओपॅथीच्या पद्धतीने चिकित्सकाचा व्यवसाय करीत असत. त्यांचा प्रल्हाद नावाचा बारा वर्षांचा मुलगा एका अपघातात मरण पावला. त्यांना खूप दु: झाले. मनाला शांती लाभावी म्हणून ते तिरुप्परयथुराई येथील रामकृष्ण तपोवनाचे स्वामी चिद्भवानंद यांना शरण गेले. स्वामींनी त्यांचे सांत्वन करून म्हटले, ‘‘या निमित्ताने परमेश्वराने तुझी सत्त्वपरीक्षा घेतली आहे. तू, इतर मुलांच्या हितासाठी झटावे, असा परमेश्वराचा संकेत आहे.’’
कनकसभाईने हा उपदेश मानला. आणि आपल्या खेडेगावी रामकृष्ण मिड्ल स्कूलसुरू केले. गेल्या २५ वर्षांच्या अथक सेवाभावी प्रयत्नांमुळे शाळेची खूप उन्नती झाली. त्या परिसरातील एक उत्तम शाळा म्हणून त्या शाळेचा लौकिक आहे. कनकसभाई आता ७८ वर्षांचे झाले आहेत. आपली संस्था अन्य कुणाच्या तरी स्वाधीन करावी असा विचार त्यांच्या मनात आला. अन्य धर्मीयांनी त्यांना कोट्यवधी रुपयांची लालूचही दाखविली. पण कनकसभाई त्याने मोहित झाले नाहीत. त्यांनी आपली ही शाळा, कोईमतूरच्या आर्ष विद्यापीठम्चे प्रमुख स्वामी दयानंद सरस्वती यांच्या चरणी समर्पित केली. स्वामी दयानंद सरस्वती हे वि. हिं. .चे अग्रगण्य धर्माचार्य आहेत, हे सर्वविदितच आहे.

शूर उमाशंकर

त्या मुलाचे नाव उमाशंकर. तो दिल्लीचा रहिवासी. वय वर्षे १२. १२ जुलै २०१० ची घटना. तो एका बसमधून शाळेला जात होता. त्याच्या समोर गर्दीने भरलेली एक मिनि बस जात होती. तिच्यात मोठ्या संख्येत विद्यार्थी होते. वळण घेताना, ती मिनी बस उलटली. खाली अनेक मुले दबली गेली. रक्ताचा सडा पडला. मुलांच्या किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले. उमाशंकरने आपल्या बसमधून उडी मारली. उलटलेल्या बसच्या खाली शिरून त्याने काही मुलांना बाहेर काढले. मिनी बसमधील सुखरूप असलेल्या उतारूंच्या मदतीने ती बस त्याने सरळ केली. या जखमी मुलांना ताबडतोब दवाखान्यात नेता यावे म्हणून त्याने रस्त्याने जाणार्या मोटरचालकांना हात दाखविला. पण कुणी थांबेचना. अखेरस तो प्राणांची पर्वा करता, जाणार्या दोन मोटरगाड्यांसमोर आडवा निजला. तेव्हा त्या गाड्या थांबल्या. जखमींपैकी सहा विद्यार्थ्यांना ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. त्यातले पाच वाचले. गणराज्य दिनाच्या वेळी शौर्यपदक देऊन उमाशंकरचा गौरव करण्यात आला.

झिलियांगरॉंग हराक्का स्कूल

नागालँडमधील पेरेन जिल्ह्यातल्या निसर्गरम्य तेनिंग गावातील ही शाळा म्हणजे एक निसर्गचित्रच वाटतं. काटकोनी बैठी शाळा, त्याच्यासमोर पटांगण, फुलझाडांची बॉर्डर, लाल पटांगण, हिरवी झाडं, निळ्या रंगाची शाळा असा एक छान हा परिसर आहे. नवीन पांढर्या इमारतीच्या छतावर छान फुलझाडांच्या कुंड्या आहेत. जुन्या शाळेत बालवर्ग चौथी ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत, तर नवीन इमारतीत पहिली ते तिसरी आणि आठवी ते दहावी असे वर्ग आहेत. इथेच कॉम्प्युटर रूम, प्रयोगशाळा, लायब्ररी, ऑफिस आणि एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हेरिटेज रूमआहे.
२० फेब्रुवारी १९८४ ला, फक्त १२ मुलं आणि मुली यांच्यासह प्रत्येक गावातल्या हिंदू कुटुंबातील काही लोकांच्या उपस्थितीत, एका झोपडीवजा घरात, विद्येची देवता सरस्वती मॉं आणि राणी मॉं (नागा राणी गाईदिन्ल्यू) यांच्या प्रतिमा ठेवून, लोकांच्या आग्रहास्तव दीपप्रज्वलन करून, नागा बंधूंच्या धार्मिक गीतगायनाने या विद्यालयाचा श्रीगणेशा झाला.
ख्रिश्चन समाजाचा प्रखर विरोध धगधगत्या दहशतवादामुळे अनंत संकटांचा सामना करीत श्री रामनगिना यादव या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्याने अतिशय कठोर परिश्रमाने, प्रसंगी शारीरिक हालअपेष्टांना सामोरे जात, कोणत्याही परिस्थितीत हार मानता, प्रयत्न चालू ठेवले या शाळेचा पाया घातला.
फक्त १२ मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत, आता दरवर्षी ४०० पेक्षा अधिक मुले प्रवेश घेतात. सुरुवातीला ही शाळा सुरूच होऊ नये म्हणून प्रयत्न करणार्या ख्रिश्चन समाजाचीही मुले, ही शाळा इतर शाळांपेक्षा अधिक चांगली आहे म्हणून या शाळेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. या मुलांना शिकविण्यासाठी लागणारा शिक्षकवर्ग मिळवणं सुरवातीला फारच कठीण गेलं. आताही हा प्रश् पूर्णपणे सुटलेला आहे असं नाही. इथे शिकवणं ही नोकरी नाही. एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एक निश्चित ध्येय समोर ठेवून वाटचाल करीत असताना, फार मोठं समाधान देणारा हा एक जिवंत, रसरशीत अनुभव आहे. अर्थातच या वेगळ्या वाटेची कास धरणार्यांची वानवा समाजात कायमच असते आणि आताही आहे. याच शाळेत शिकलेले काही विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षकाचे काम करतात. शिक्षणाचे नवीन प्रवाह, नवीन पद्धती येथे अजून रुजायच्या आहेत. परंतु अतिशय कठी परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने इथले शिक्षण सुरू आहे. अभ्यासाव्यतिरिक्त बर्याच उपक्रमांत मुलांचा मुलींचा सहभाग असतो. चित्रकला, खेळ, वक्तृत्व अशा स्पर्धा शिक्षक आयोजित करतात. राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळलेले जिनलॉक सर हे गजब के खिलाडी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतून आज ना उद्या एखादा राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉलपटू उदयास येण्याची शक्यता आहे. वनवासी कल्याण आश्रम मुलांच्या क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
नागा समाजातल्या उपजत नृत्य-गायन कलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम येथे नेहमीच साजरे होतात. अशा स्पर्धांत इथली मुले नेहमीच सहभाग घेतात. बक्षिसेही मिळवतात. त्यांची रोजची प्रार्थनाही श्रवणीय असते. रक्षाबंधन सण धूमधडाक्यात साजरा होतो. फूलमून डे’ (पौर्णिमा) दर महिन्याला साजरी होते. शिक्षक दिनाच्या दिवशी मुले शिक्षकांसाठी वेलकम सॉंगम्हणतात. पारंपरिक नृत्य सादर करतात आणि बालकदिनाला शिक्षक मुलांसाठी वेलकम सॉंगम्हणतात आणि पारंपरिक नृत्यही सादर करतात. ही देवघेव लक्षणीय आहे.
पर्यावरणदिवस सर्वत्र साफसफाई करून साजरा होतो. दर महिन्यातील एक दिवस समाजकार्य म्हणून साजरा होतो. या शाळेचा रौप्य महोत्सवी समारंभ नागालँडचे मुख्य मंत्री नैफ्यू रिओ यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ ऑक्टोबर २००९ रोजी पार पडला. त्यावेळी मुख्य मंत्र्यांनी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले आणि शाळेला देणगीही दिली.
अशा या शाळेचा विकास होऊन महाविद्यालय सुरू व्हावे अशी स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. ती शाळेच्या सुवर्ण महोत्सवापर्यंत पूर्ण होवो अशी शुभेच्छा.
(‘ईशान्यवार्ता’- मार्च २०१२ च्या अंकातील ज्योती शेट्ये, डोंबिवली यांच्या लेखावरून साभार)

-मा. गो. वैद्य
babujivaidya@gmail.com
नागपूर
दि. २१-०४-२०१२

No comments:

Post a Comment