Saturday, 12 May 2012

संघस्वयंसेवकांचे व्यवहार


रविवारचे भाष्य दि. १३-०५-२०१२ करितादिनांक २५ मार्च २०१२ च्या अंकासाठी लिहिलेल्या संघाची व्याप्ती, शक्ती आणि रीतीया शीर्षकाच्या भाष्यावरबर्याच प्रतिक्रिया मला मिळाल्या. याचे कारण, केवळ त्या भाष्याची गुणवत्ता हे नाही, तर संघाच्या श्रेष्ठ अधिकार्यांनी त्याची दखल घेतली आणि ते, संघाची म्हणून जी जागरणपत्रे प्रकाशित होत असतात, त्यांत प्रकाशित व्हावीत, अशी सूचना केली म्हणून. बहुधा ते निरनिराळ्या प्रांतांमध्ये प्रकाशित होणार्या आणि संघविचाराने अनुप्राणित असलेल्या अन्य नियतकालिकांमध्येही त्याचा अनुवाद प्रकाशित झाला असावा. मुंबईहून प्रकाशित होणार्या विवेकया मराठी साप्ताहिकात, जसा तो लेख प्रकाशित झाला, तसाच दिल्लीहून प्रकाशित होणार्या पांचजन्यया हिंदी साप्ताहिकातही, थोडा संक्षेप करून का होईना, प्रकाशित झाला. हरयाणातील संघाचे एक माजी ज्येष्ठ अधिकारी यांनीही, त्या लेखाचे हिंदी भाषांतर वाचू, तो इंग्रजीतही अनुवादित व्हावा, अशी उत्कट इच्छा प्रकट केली. एवढेच नव्हे, तर हरयाणात येणार्या सर्व हिंदी दैनिकांमध्ये तो प्रकाशित व्हावा, अशी खटपट करणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

प्रतिक्रिया

वरील भाष्यऔरंगाबादवरून प्रकाशित होणार्या देवगिरी तरुण भारतातआणि सोलापूरच्या सोलापूर तरुण भारतातही ते दिनांक २५ मार्चलाच प्रकाशित झाले असणार. पण त्या भागातून मात्र काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत तरी पोचल्या नाहीत. कदाचित्, त्या वृत्तपत्रांपर्यंतच मर्यादित असतील. विदर्भातून प्रतिक्रिया येण्याचा संभवच नव्हता. कारण, नागपूरवरून प्रकाशित होणार्या तरुण भारताची माझ्यावर वक्रदृष्टी असल्यामुळे, तेथे तो प्रकाशित होणे शक्यच नव्हते. मात्र विवेकमधील लेख वाचून मुंबई तसेच सांगलीवरून प्रतिक्रिया मिळाल्या. त्या लेखाचा संदर्भ देता, पण स्वतंत्रपणे नाशिकवरूनही एक वेगळीच प्रतिक्रिया प्राप्त झाली.

प्रश्

या प्रतिक्रियांमधील कौतुकाचा भाग सोडला, तरी एक समान मुद्दा, तोही टीकात्मक, जो प्रकट झाला, तो अशा व्यापक, शक्तिशाली आणि राष्ट्रभक्त अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणार्या स्वयंसेवकांच्या व्यवहारांच्या संदर्भात होता. एक प्रतिक्रिया प्रश् करते की, संघस्थानावर आणि संघाच्या कार्यक्रमापुरतेच संघाचे संस्कार सीमित असतात काय? इतर क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रकाश का पडत नाही? सांगलीच्या एका स्वयंसेवकाची, दि. मे ला यवतमाळच्या कार्यक्रमात भेट झाली. प्रसंग होता संघाचे उत्तम कार्यकर्ते आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री वसंतराव फडणवीस यांनी लिहिलेल्या त्वदीयाय कार्यायया त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा. माझे त्यात मुख्य भाषण होते. माझ्या भाषणाचा केंद्रबिंदू संघाचा स्वयंसेवक हाच होता. कार्यक्र संपल्यानंतर सांगलीचे ते गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, संघाच्या बाहेर स्वयंसेवक का चांगले वागू शकत नाहीत? त्यांनी सांगलीच्याच एका शिक्षणसंस्थेचे उदाहरण दिले. संचालक मंडळी संघाचीच म्हणजे संघसंबंधित आहेत. पण संस्थेचा कारभार भ्रष्टाचारापासून अलिप्त नाही. तेथे सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य आहे. तेथील कार्यक्रमसमाप्तीनंतरच्या एकूण वातावरणात त्यांच्याशी सविस्तर बोलणे शक्यच नव्हते. शिवाय, आम्हाला नागपूरला परतण्याची घाई होती. पण त्यांच्या प्रश्नाचे मला विस्मरण मात्र झाले नाही.

रीतच न्यारी

कालपरवाच, दुसर्या संदर्भात, नाशिकच्या एका स्वयंसेवकाने, भाजपाच्या नेत्यांना पाठविलेल्या पत्राची एक प्रतच माहितीसाठी माझ्याकडे पाठविली. त्यात तो लिहितो, ‘‘मला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रकर्षाने जाणवते की, संघाने भाजपाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हिंदुत्वविचाराचा पक्ष- भाजपा- स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात सत्ताधारी झाला पाहिजे. यासाठी संघाने सर्वंकष प्रयत्न केला पाहिजे.’’ हे पत्र मी एका स्वयंसेवकाला वाचायला दिले. त्याने प्रश् केला की, ‘‘खरेच भाजपा हिंदुत्वविचाराचा पक्ष राहिला आहे?’’ २५ मार्चच्या लेखात संघाच्या व्याप्तीचा विषय मांडताना मी सांगितले होते की, नागपूरला झालेल्या मार्च २०१२ च्या . भा. प्रतिनिधिसभेत, संघाचे स्वयंसेवक समाजजीवनाच्या ज्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहेत, अशा ३५ संघटनांनी आपला अहवाल सादर केला होता. भाजपा, विहिंप, विद्यार्थी परिष, भामसं वगैरे मोठ्या संघटनांची नावे तर सर्वविदित आहेतच. पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात, राष्ट्र सीमारक्षण जागृतीच्या क्षेत्रात, अगणित जनजातींनी व्यापलेल्या वनवासी क्षेत्रात, संघाचे स्वयंसेवक जे कार्य करीत आहेत, त्याची किती जणांना कल्पना असेल? राजकारणातील घडामोडींचीच प्रसारमाध्यमांमध्ये विशेष चर्चा असते. ते स्वाभाविकही आहे आणि संघ म्हणजे संघाचे स्वयंसेवक प्रचाराच्या मागे लागलेलेही नसतात. संघ १९२५ साली स्थापन झाला. पण त्याचा साधा प्रचारविभागही नव्हता. तो १९९४ साली म्हणजे जवळजवळ ७० वर्षांनी स्थापन झाला. मला नाही वाटत, प्रसिद्धीच्या बाबतीत कुणा संस्थेची एवढी अनास्था असेल? संघाचा अधिकृत प्रवक्ताही नव्हता. सन २००० मध्ये मी पहिला प्रवक्ता बनलो. मी तीन वर्षे प्रवक्ता होतो आणि मजेची गोष्ट ही की २००६ नंतर हे पदच समाप्त करण्यात आले. खरेच संघाची रीतच न्यारी आहे.

राष्ट्रगौरवासाठी

मी आवर्जून सांगत असतो की, संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे. समाजाच्या अंतर्गत एक संघटित गट किंवा टोळी किंवा एखादी संस्था स्थापन करून आपले वेगळेपण कुरवाळत राहणे हे संघाला अभिप्रेत नाही. तो संपूर्ण समाजजीवनाला आपल्या कवेत घेत असतो. द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या दोन वचनांचा मी अनेकदा संदर्भ देत असतो. १९५४ साली गुरुजी म्हणाले होते की, ‘‘विभिन्न क्षेत्रांत गेलेले आपले स्वयंसेवक हे संघाचे राजदूत आहेत.’’ तरी त्या वेळी फक्त दोनच क्षेत्रांत संघाचे कार्यकर्ते गेले होते. () राजकारणात म्हणजे भारतीय जनसंघात आणि () विद्यार्थी क्षेत्रात- विद्यार्थी परिषदेच्या रूपाने. जवळजवळ १८ वर्षांनी ठाणे येथील कार्यकर्त्यांच्या चिंतन-बैठकीत श्रीगुरुजी म्हणाले होते, ‘‘विभिन्न क्षेत्रांत गेलेले आपले कार्यकर्ते आपले सेनापती आहेत.’’ राजदूत कुठल्याही देशात गेला तरी आपल्या देशाच्या हिताचाच विचार करीत असतो आणि सेनापती आपल्या देशासाठीच विजय प्राप्त करीत असतो. संघाचे हे राजदूतआणि सेनापतीयांना अनुक्रमे कुणाचे हित बघायचे आहे आणि कुणासाठी पराक्रम गाजवायचा आहे? अर्थात्, समाजाचे हित, राष्ट्राचे हित आणि समाजासाठी विजिगीषू पराक्रम. संघाच्या कुठल्याच व्यक्तीला स्वत:च्या मोठेपणाची हाव नाही; नसतेच; आणि त्याला स्वत:साठी कसलेही पद नको असते. कसलीही प्रसिद्धी नको असते. त्याला अभिप्रेत असते आपल्या देशाची प्रतिष्ठा, आपल्या देशाचे वैभव आणि आपल्या देशाचा गौरव.

संघ म्हणजे?

देशाची म्हणा राष्ट्राची म्हणा प्रतिष्ठा, वैभव आणि गौरव कुणावर अवलंबून असतात? त्या देशातील नागरिकांच्या वर्तनावरच की नाही? क्षणभर, आपण देश राष्ट्र यांचा विचार बाजूला ठेवू. संघाची प्रतिष्ठा आणि संघाचा गौरव यावरच आपले लक्ष केंद्रित करू. कुणावर अवलंबून आहे संघाची प्रतिष्ठा आणि गौरव? अर्थात्च संघाच्या स्वयंसेवकांवर. कारण, संघ म्हणजे तरी काय? संघ म्हणजे स्वयंसेवकच की नाही? संघ म्हणजे नुसता भगवा झेंडा नव्हे; संघस्थानही नव्हे; केवळ कार्यक्रमही नव्हेत; एवढेच काय तर केवळ संघाचे पदाधिकारीही नव्हेत. संघ म्हणजे त्याचे स्वयंसेवक. स्वयंसेवकांना वगळले तर संघ शिल्लक राहील? म्हणून स्वयंसेवकांवर फार मोठी जबाबदारी आहे.

गौरवासाठी

साध्या साध्या व्यवहारात स्वयंसेवकत्व प्रकट झाले पाहिजे. चौकात लाल बत्ती लागली आहे ना, मग स्वयंसेवकाचे वाहन थांबलेच पाहिजे. तिकीट काढायचे आहे काय, त्याने रांगेत उभे राहिलेच पाहिजे. घरी विवाह आहे तर हुंडा आदिपासून तो अलिप्त असलाच पाहिजे. कारखान्यात असो की कार्यालयात असो, काम पूर्ण शक्तिनिशी निर्भेळ प्रामाणिकपणे त्याने केले पाहिजे. शिक्षक असेल, तर त्याने नीट तयारी करून शिकविले पाहिजे. माझा विद्यार्थी, मी शिकवीत असलेल्या विषयात कधीच अनुत्तीर्ण होणार नाही, असा त्याचा बाणा असला पाहिजे. त्यासाठी अधिकची मेहनत आवश्यक असेल, तर तीही त्याने केली पाहिजे. तो दुकानदार असेल, तर त्याच्या दुकानातील माल भेसळरहित, नीट वजनाचा योग्य किमतीचाच असला पाहिजे. शिक्षणसंस्थेचा चालक असेल, तर त्याच्यासमोर त्याच्या संस्थेचेच हित असले पाहिजे. कारखानदार असेल, तर त्याच्या कारखान्यात तयार होणारा माल श्रेष्ठ दर्जाचाच असला पाहिजे. या सामान्य गोष्टींनी तो स्वत:चीच केवळ प्रतिष्ठा आणि गौरव वाढवीत नाही, तर संघाची म्हणजेच देशाचीही प्रतिष्ठा आणि गौरव वाढवीत असतो.

उदाहरणे

एक अनुभवलेले उदाहरण देतो. सुमारे साठ-पासष्ट वर्षांपूर्वीचे. मी तेव्हा नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजात प्राध्यापक होतो. मला ज्येष्ठ असलेल्या एका प्राध्यापकाने, इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या फ्लेक्स कंपनीचा जोडा खरेदी केला होता. एक महिन्यातच त्याच्या तळव्याचे चामडे उखडले. ते त्याने मला दाखविले. मी म्हणालो, कंपनीला पत्र लिहू. मी एका पोस्टकार्डावर तक्रार लिहिली आणि ती कंपनीकडे पाठवून दिली. कंपनीचे पत्र आले की, तो जोडा आमच्याकडे पाठवा. मी त्यांना म्हणालो, ‘‘द्या पाठवून.’’ ते तयार होईनात. म्हणाले, ‘‘हा जोडा मी दुरुस्त करीन वापरीन.’’ पण, माझ्या आग्रहास्तव त्यांनी जोडा कंपनीकडे पाठविला. आठ दिवसांत, कंपनीकडून नवीन जोडा, क्षमायाचनेचे पत्र आणि जोडा पाठविण्याच्या खर्चाची रक्कम आली. कुणाची प्रतिष्ठा वाढली? केवळ फ्लेक्स कंपनीची नाही, तर इंग्लंडचीही. आपण संघात शिस्त पाळतो. ेळही पाळतो. पण अन्य घरगुती किंवा सार्वजनिक कार्यांमध्ये ती पाळतो काय? जाहीर केलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरू होतो काय? वर, यवतमाळच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे. दुपारी वाजता कार्यक्रम सुरू व्हायचा होता. मे महिन्यातली दुपार बरं! आम्ही ठीक वाजता सभागृहाच्या प्रवेशद्वाराशी पोचलो. सुवासिनींनी आम्हाला ओवाळले आणि वाजून मिनिटांनी व्यासपीठावर आम्ही स्थानापन्न झालो. ही संघाची रीत आहे. राजकारणात गेलेल्या संघ स्वयंसेवकांना हे जमते काय? का जमत नाही? उशिरा जाण्यात प्रतिष्ठा आहे म्हणून? की आपण संघाचे स्वयंसेवक आहोत, याचा विसर पडतो म्हणून? कै. रामभाऊ म्हाळगीही राजकारणात होते. आठवते का, ते कधी कुणा कार्यक्रमात उशिरा पोचल्याचे? प्रधानमंत्री मुरारजींची गोष्ट सांगतो. १९७७ साली ते प्रधानमंत्री झाले. . भा. संपादक परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीला होती. मुरारजीभाईंना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रणपत्रिकेत सकाळी १० ची वेळ छापलेली होती. मी त्या कार्यकारिणीचा सदस्य होतो. परिषदेचे एक पदाधिकारी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, ‘‘आपण सव्वादहापर्यंत या.’’ मुरारजीभाई म्हणाले, ‘‘मी येणार नाही. १० वाजता कार्यक्रम आहे, तर मी १० वाजता पोचेन.’’ संपादक परिषदेचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘अहो, आम्हीच तुम्हाला सांगतो आहोत की आपण सव्वादहाला या.’’ त्यावर मुरारजीभाई म्हणाले, ‘‘किती लोकांना हे तुम्ही सांगाल? अधिकांश लोक तर हेच समजतील की, मुरारजी पंधरा मिनिटे उशिरा आला.’’ ते बरोबर १० वाजता आले. मुरारजीही राजकारणातच होते ना!

शस्त्राची धार

हे खरे आहे की, मी या अंकात सामान्य गोष्टी सांगितल्या. मोठी गोष्ट भ्रष्टाचाराची आहे. भाजपात पुरेसे संघाचे स्वयंसेवक आहेत. मग का त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा होत असते? किती तरी स्वयंसेवक विचारीत असतात की, ‘‘येदीयुरप्पा संघाचे स्वयंसेवक आहेत काय? बंगारू लक्ष्मण स्वयंसेवक आहेत काय?’’ माझ्या जवळ उत्तर नसते. राजकारणातील लोकांबद्दल असे अनेक भ्रष्टाचाराचे किस्से ऐकायला मिळतात आणि मग वारंवार प्रश् कानावर येतो की, संघाच्या संस्कारांचे काय? मी त्यांचे समाधान करतो की, संस्कारांची धार ही शस्त्राच्या धारेसारखी असते. ती एकदा पाजवून चालत नाही. कालांतराने ती बोथट होते. वस्तर्याला नाही का वारंवार पाजवावे लागत? संस्कारांचेही तसेच आहे. पुन: त्यांची धारच चढविली गेली नाही तर ती बोथट होणारच. जेथे आपोआप धार तीक्ष्ण केली जाते, अशा संस्कारस्थानापासून, म्हणजे संघस्थानापासून म्हणाथवा संघाच्या वातावरणापासून ते दूर राहिलेले आहेत. म्हणून हे अध:पतन आहे.

राजदूत?

कर्नाटक, उत्तराखंड, अलीकडे राजस्थान या राज्यांतील भाजपाच्या तथाकथित श्रेष्ठ कार्यकर्त्यांचे वर्तन बघितले की, असा प्रश् पडतो की, कोणत्या अर्थाने यांना स्वयंसेवक म्हणावे? पदासाठी, तिकिटासाठी, एकमेकांचे पाय का ओढले जावेत? ‘ऐवजी मंत्री बनला किंवा आमदार बनला, किंवा त्याला तिकीट मिळाले तर देशाचे कोणते अहित होणार आहे? पण असे प्रश्नच मनात उठत नाहीत. हे कसले संघाचे राजदूत किंवा सेनापती?
मी फक्त राजकीय क्षेत्राचे उदाहरण घेतले. सहकार क्षेत्रातही आपले कार्यकर्ते आहेत. त्यांचेही ध्यान असले पाहिजे कुणी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तर करणार नाहीत इकडे. जे सहकाराचे तेच शिक्षण आणि अन्य क्षेत्रांचेही. २५ मार्चच्या लेखात मी सरकार्यवाहाच्या निवडणुकीचा प्रसंग मुद्दाम वर्णन केला आहे. का अशी निवडणूक होत नाही, राजकीय पक्षात किंवा सहकाराच्या क्षेत्रात? कुठे कुठे तर स्वत:ला स्वयंसेवक म्हणणार्यांचीच दोन दोन पॅनेल उभी असतात. का? कशासाठी?

अधिष्ठान

मला या संदर्भात दोन उपाय सुचतात. एक म्हणजे मूलभूत, आधारभूत असे जे तत्त्व किंवा तत्त्वज्ञान आहे, त्याचे वारंवार स्मरण करून दिले गेले पाहिजे. भगवद्गीतेने यालाच अधिष्ठानम्हटले आहे. कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी हे अधिष्ठाननितांत गरजेचे आहे. मग येतो दुसरा घटक. गीतेने त्याला कर्ताम्हटले आहे. कर्ता म्हणजे कार्यकर्ता. त्यानंतर येतात साधने (करण) आणि नंतर कार्यक्रम (विविधाश्च चेष्टा:) येतात. आपले अधिष्ठान आहे हिंदुत्व.म्हणजेच सांस्कृतिक राष्ट्रभाव. त्याचा विस्तार येथे करण्याचे प्रयोजन नाही. पण हे प्रत्येकाला प्रतिक्षणी जाणवले पाहिजे, कधीही विस्मरणात जाता कामा नये की, ‘हिंदुत्वा कोणताही संकुचितपणा नाही, सांप्रदायिकता नाही. सर्वसमावेशकता आहे. म्हणून हे ध्यानात घेतले पाहिजे आणि नित्य स्मरणात ठेवले पाहिजे की, ‘हिंदुत्वाची कास धरली तरच भाषिक, जातीय, प्रांतीय संकुचित अस्मिता मागे पडतील. मग जनगणनेत जातीचा अंतर्भाव करण्याचा विचार स्वीकृत व्हायचा नाही. संस्कृती किंवा सांस्कृतिक व्यवस्था म्हटले की एक विशिष्ट मूल्यव्यवस्था (Value-sysem) असते. तिचा ठसा कार्यकर्त्यांच्या मनबुद्धीवर कायमचा अंकित असला पाहिजे. त्या ठशाने अंकित झालेला कर्ता म्हणजे कार्यकर्ते. ते मग मूल्यनिष्ठ साधनांची जुळवाजुळव करतील. त्या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कार्यक्रमांची रचनाही करतील. मूल्यनिष्ठ जगायचे असेल तर त्यासाठी जी किंमत मोजावी लागते, ते ती मोजतील. आवश्यक किंमत देण्याची तयारी आणि हिंमत असेल तरच कोणतेही मूल्य प्रस्थापित होत असते. असे मूल्यनिष्ठेने ओतप्रोत असलेले कार्यकर्तेच आपल्या संस्थेचा गौरव वाढवीत असतात.

स्वच्छ प्रवाह

प्रत्येकच क्षेत्रात गैरव्यवहाराची घाण असू शकते. कुठे जास्त, कुठे कमी. राजकीय क्षेत्रात ती अधिक असेल. ती साफ करायची असेल, तर त्या क्षेत्रात उतरावेच लागेल. पण स्वच्छ पाण्याचा प्रवाह घेऊनच. अन्यथा त्या घाणीनेच आपलीही तोंडे काळवंडल्याशिवाय रहावयाची नाहीत. या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहाचे दोन घटक असतात. एक असतो मूलभूत अधिष्ठान आणि दुसरा कार्यकर्त्यांचे निष्कलंक चारित्र्य. संघाच्या स्वयंसेवकांच्या सामान्य व्यवहारातून, मग ते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असोत, हे चारित्र्य प्रकटले पाहिजे. त्याने त्यांचाच नव्हे, तर त्या कार्यक्षेत्राचा, पर्यायाने संघाचा आणि पर्यायाने आपल्या प्राणप्रिय देशाचा राष्ट्राचाही गौरव वाढेल. स्वत:ला संघाचे स्वयंसेवक म्हणवून घेणार्यांना ही जबाबदारी पेलता आली पाहिजे. या दृष्टीने ते विचार करावयाला प्रवृत्त होतील?

-मा. गो. वैद्य
babujivaidya@gmail.com
नागपूर
दि. १२-०५-२०१२

5 comments:

 1. Sanghachya adhikaryancha vyavahar dekhil surane avashyak ahe.
  Tarun swayamsewak satat pahat stat va yacha wait parainam hoto.

  ReplyDelete
 2. I am regular reader of your blog. If swayamsevaks or adhikaries don't behave in accordance with what is expected from them what one can do. As you said in your blog "Vakradrushti" what can you do?

  ReplyDelete
 3. भाष्य आवडले ......
  विविध आयमा मधील स्वयंसेवकांना एकत्रित आनने गरजेचे आहे .
  महेशचंद खत्री .
  मेहकर जिल्हा .
  विदर्भ .

  ReplyDelete
 4. nicely written .. let us all try to get closer towards 'swayamsewak'ness ..

  ReplyDelete
 5. Pranam
  I am RSS swayamsevak for last 6 years. I have read your article . but i find lack of solution about how to tackle problems within organizations with respect to current time.
  i would like to read more elaborated article on this...

  ReplyDelete