Saturday 2 June 2012

इ त स्त त:



रविवारचे भाष्य दि. जून २०१२ करिता


कृतज्ञता

हैफा हे इस्रायल देशातील एक नगर आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी ते तुर्की साम्राज्यात होते. १९१८ साली, ते जवळजवळ चारशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त करण्यात आले. हैफाच्या या मुक्तिलढ्यात भारतीय सैनिकांचा फार मोठा वाटा आहे. हैफाच्या नगरपालिकेने आपल्या शालेय पुस्तकात, भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्हे, तो अंमलातही आणला आहे.
सुमारे ९०० भारतीय सैनिक या लढाईत मृत्युमुखी पावले होते. या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी इस्रायलमधील भारतीय सैनिकांची स्मृतिचिन्हे’ (मेमोरियल्स ऑफ इंडियन सोल्जर्स इन् इस्रायल) या पुस्तकाच्या प्रकाशनाचा एक कार्यक्रम संपन्न झाला. भारताचे इस्रायलमधील राजदूत नवतेज सरणा हे मुख्य अतिथी होते. दरवर्षी २३ सप्टेंबरला भारतीय सेनाही हैफा दिवसया नावाने हा दिवस साजरा करते. या लढाईतील बहादुरीसाठी कॅ. अमरसिंग बहादूर आणि जोरसिंग यांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिटआणि कॅ. अनुपसिंग ले. सगतसिंग यांना मिलिटरी क्रॉसदेऊन, त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने गौरविले होते.

... ...

महिलांची वेद पाठशाळा

कोळीकोड (बहुधा आपले कालिकत) हे केरळ राज्यातील मोठे शहर आहे. तेथे काश्यप वेद रीसर्च फाऊंडेशनया नावाच्या संस्थेचा एक मठ आहे. त्याचे नाव काशीमठ.दर रविवारी या मठाचा परिसर वेदमंत्रांच्या उच्चारणाने जागा होतो. कोण करतात हा मंत्रोच्चार माहीत आहे? महिला! आणि त्यांची संख्या असते सुमारे ३००! दर रविवारी त्या या मठात येतात. १३-१४ जणींचे गट पडतात; आणि त्यांचे मंत्राध्ययन सुरू होते.
वेदमंत्र शिकविणार्या व्यक्तीचे नाव आहे सुयश आर्य. काश्यप वेद संस्थेचेसंस्थापक आचार्य राजेश यांचे ते शिष्य. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांनी महिलांना पौरोहित्याचे शिक्षण देण्याचा उपक्रम चालविला आहे. जात आणि वय यांचा विचार करता हे शिक्षण चालू आहे. ब्राह्मणांनी आणि त्यातही पुरुषांनीच वेदमंत्रांचा पाठ करण्याची जुनी परंपरा त्यांनी मोडीत काढली आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये १० हजाराहून अधिक संख्येतील महिलांना पौरोहित्याचे प्राथमिक कर्मकांड शिकविण्यात आले आहे. कोळीकोड व्यतिरिक्त कन्नूर, मलप्पुरम, त्रिशूर येथील महिलांनीही याचा लाभ घेतलेला आहे.
त्यातील काही महिला पौरोहित्यात इतक्या पारंगत झाल्या आहेत की, त्या अग्निहोत्र, स्मार्त श्रौत यज्ञ आणि सोळा संस्कार यात अंतर्भूत असणारे सर्व विधी यथाशास्त्र पार पाडू शकतात. आचार्य राजेश यांचे उद्दिष्ट, परमेश्वर त्याचा भक्त यांच्यातील मध्यस्थाला हटविणे हा आहे. आपल्या घरात जे पूजाविधी करावयाचे असतात, ते घरातील गृहस्थ गृहिणी यांनीच केले पाहिजेत, असा आचार्य राजेश यांचा आग्रह असतो.
वेदमंत्रपाठाचे अध्यापन करणार्यांत महिलाही आहेत. एम. सयजा नावाची महिला, तेथील हायर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षिका आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती वेदमंत्रपाठाची अध्यापिका बनली आहे. ती आपला अनुभव सांगते की, ‘‘या वेदपाठांमुळे, मला माझ्या विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षणाचे धडे देणेही सुलभ झाले आहे.’’ निमिषा ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ती म्हणते, ‘‘ वेदमंत्रांच्या पठनामुळे, संकटाच्या प्रसंगी शांतपणे विचार करण्याची शक्ती माझ्या ठिकाणी आली आहे. तसेच मला भारताच्या प्राचीन परंपरेचेही ज्ञान झाले आहे.’’
वेदांचे शिक्षण घेण्याच्या संबंधात लोकांमध्ये निर्माण झालेल्या उत्सुकतेची काश्यप वेदपीठालाजाणीव आहे. ते आता एका भव्य गुरुकुलाच्या स्थापनेचा विचार करीत आहे. या गुरुकुलाच्या उभारणीला सुमारे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एका वेळी पाचशे लोक बसू शकणारे एक भव्य सभागृह आणि एक आश्रम बांधण्यात येणार आहे. हे वेदपीठ चेन्नई, बंगलोर आणि मुंबई येथेही अल्पकालीन शिबिरे आयोजित करीत असते.

... ...

आकर्षण

दिवसेंदिवस हरिद्वारला येणार्या विदेशी मंडळींची संख्या वाढत आहे. हे सर्व विदेशी उच्च शिक्षाविभूषित आहेत; आणि त्यांच्या ठिकाणी हिंदू धर्माविषयी उत्कंठा आस्थाही निर्माण झाली आहे. मूळचे मॉस्कोचे रहिवासी, ५६ वर्षीय, व्हिक्टर शेवित्सोव, रशियनांना हिंदू धर्माचे आकर्षण का वाटते, हे सांगताना, म्हणतात, ‘‘हिंदुस्थानात आणि पूर्व आशियातही धार्मिकनेते लोकांशी बोलत असतात. ते आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असतात. आमच्या देशातील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्चमध्ये असे कधी घडत नसते.’’ अनेक रशियनांनी हिंदू धर्माचा स्वीकारही केलेला आहे. प्रोखोर बाश्कातोव्ह हा ३७ वर्षांचा, घरबांधणी त्यांची खरेदी-विक्री करणारा व्यावसायिक तर रशियन चर्चला दोष देऊनच मी हिंदू झालोअसे परखडपणे सांगतो. या दोन्ही रशियनांचे हरिद्वारच्या गायत्री परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. ते गायत्री मंत्राच्या जपाचा आग्रह धरीत असतात. भारतात शिक्षण घेत असलेली २२ वर्षांची दक्षिण कोरियाची दासोम हर ही तरुणी म्हणते, ‘‘माझ्या आईवडिलांना भारत, योग आणि भारतीयांची नीतिमत्ता यांनी खूपच आकृष्ट केले होते.’’ तिचे वडील वारल्यानंतर तिच्या आईने भारतात येण्याचा निश्चय केला. ती म्हणते, ‘‘भारतातच मला जीवनमूल्यांचे शिक्षण मिळेल.’’

... ...

परिवर्तन

एकल विद्यालयम्हणजे काय, हे रा. स्व. संघाशी जवळीक असणार्यांना अज्ञात नाही. एकल विद्यालयम्हणजे एकशिक्षकी शाळा. त्या कुठे भरतात? जंगलात, रानावनात, जेथे कोणतीही शाळा नाही तेथे आणि शाळा असली तरी त्या शाळेत जेथील मुलेमुली जात नाहीत, तेथे. ही अतिशयोक्ती नाही. सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आम्ही काही जण, झारखंडातून जात होतो. वाटेतील एका एकल विद्यालयाला भेट, हा आमच्या कार्यक्रमाचा एक भाग होता. सडकेपासून गाव दूर नव्हते. गावात शाळा होती. म्हणजे शाळेची इमारत होती. शिक्षकही नियुक्त होते. पण शाळा चालत नव्हती. कारण, विद्यार्थी तेथे जात नव्हते. मी कारण विचारले तेव्हा कळले की, शाळा सकाळी १०.३० ते .३० भरते; आणि त्या अवधीत गावातली मुलेमुली, गाई-बकर्या चरायला घेऊन जात असतात. पण एकल विद्यालय चालू होते. कारण ते सायंकाळी ६॥ ते भरे.
आमच्या समोर ५५ विद्यार्थ्यांना उपस्थित करण्यात आले. त्यांचे पालकही आले होते. या ५५ मध्ये २३ मुली होत्या. त्या सर्वांनी पाढे म्हणून दाखविले. काही गाणीही म्हणून दाखविली. या सर्वांसाठी फक्त एक शिक्षक होता. तोही नववा वर्ग पास. पगार फक्त ५०० रु. महिना. मी त्याला विचारले, ‘‘एवढ्या कमी पगारात तुझे कसे काय भागते?’’ तो म्हणाला, ‘‘माझा शिंप्याचा व्यवसाय आहे की? हे माझे जास्तीचे उत्पन्न आहे.’’
तर अशी एकल विद्यालये, संघाशी संबंधित वनवासी कल्याण  आश्रमाकडून चालविली जातात. थोडीथोडकी नाही. हजारो. एकट्या झारखंडात आठ हजाराहून अधिक एकल विद्यालये आहेत. ही एकल विद्यालये ज्या प्रमाणे मुलामुलींनाच शिकवितात, त्याचप्रमाणे त्यांचा संपर्क प्रत्येक घराशी असतो; आणि त्यामुळे तेथील सामाजिक जीवनातच इष्ट परिवर्तन झाले आहे.
हा केवळ अर्थवाद नाही. प्रत्यक्ष अनुभव आहे. कुणाचा?- तर तामीळनाडूतील मदुरेच्या टाटा धन ऍकेडमीचा.ही ऍकेडमी, बंगलोरच्या आयआयएम्म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटया सुप्रसिद्ध संस्थेशी संलग्न आहे. या ऍकेडमीचे प्राध्यापक डॉ. व्ही. आर. शेषाद्री यांच्या नेतृत्वाखाली, तिच्या विद्यार्थ्यांनी एकूण ५०८ एकल विद्यालयांना भेट दिलीती तामीळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार आणि झारखंड या सात राज्यांमधील होती. या विद्यालयांनी तेथील समाजजीवनात कोणते परिवर्तन घडवून आणले, हे बघणे, हा या निरीक्षण-प्रकल्पाचा हेतू होता.
काय जाणवले, या अभ्यासकांच्या चमूला? त्यांना आढळले की-
) मध्येच शाळा सोडून जाणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
) त्यांना या विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची जाण दिसली.
) ही एकल विद्यालये, विद्यार्थ्यांना नैतिक मूल्याधारित शिक्षणही देत असल्यामुळे, त्यांच्या वर्तनावर त्याचा परिणाम झाला आहे.
) या विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा त्यांच्या आईवडिलांवर आणि एकूणच समाजावरही इष्ट परिणाम झाला आहे. सध्याच्या शहरीकरणाच्या वातावरणामुळे, गावे ओसाड होत आहेत आणि व्यक्ती अधिकाधिक आत्मकेंद्रित बनून आपल्या पारंपरिक जीवनमूल्यांपासून दूर जात आहेत. ज्या गावात एकल विद्यालय आहे, तेथली परिस्थिती याच्या विपरीत आहे.
) औपचारिक शिक्षणाबरोबरच खेळ, कथाकथन, संगीत यांच्याही शिक्षणाचा अंतर्भाव असल्यामुळे, असे दिसून आले की, विद्यार्थ्यांची समज आणि स्मरणशक्तीही वाढली आहे.
) पालक, आपल्या पाल्यांना एकल विद्यालयात पाठविणे, अधिक पसंत करतात, असे या अभ्यासचमूला आढळून आले.
) विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावनाही दिसून आली.
या निरीक्षणानंतर बंगलोरच्या आयआयएम्ने, मे २०१२ ला एकदिवसीय परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परिसंवादाचा विषय होता- ‘‘एकल विद्यालयांच्या परिणामांच्या संदर्भात समावेशक शिक्षण (इक्लुजिव् एज्युकेशन) आणि सामाजिक विषमतेच्या भावनेचे क्षरण.’’

... ...

दक्षिण कोरियात वैदिक गणित

श्री रविकुमार हे हिंदू स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत. सेवा इंटरनॅशनलया संस्थेशी ते संलग्न आहेत. दि. २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०१२ ला ते दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे होते. त्यांच्या प्रेरणेने सेऊल राष्ट्रीय विद्यापीठ आणि सुंग क्यून क्वान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वैदिक गणित आणि वैदिक विज्ञान या विषयावर तीन कार्यशाळा तेथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यशाळांमध्ये विद्यापीठातील गणित विषयाचे प्राध्यापक, अधिष्ठाते, संशोधक विद्यार्थी, तसेच पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी यांनी भाग घेतला होता.
या कार्यशाळांतील अनुभवाने ते इतके प्रभावित झाले होते की, या कार्यशाळा आणखी अधिक काळ चालू ठेवाव्यात अशी त्यांनी विनंती केली. या कार्यशाळांतून तयार झालेल्या तीन विद्यार्थ्यांनी नंतर एका मंदिरात वैदिक गणितावर वर्ग घेतले. श्री रविकुमार यांनी सेऊलमधील राधाकृष्ण मंदिरामध्ये दक्षिण पूर्व आशियातील जनतेवरील हिंदूंच्या प्रभावावर सचित्र व्याख्यानेही दिली.
या भाषणात कोरियन भाषा तमिळ भाषा यांच्यातील साम्यांची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. (रविकुमार तमिळभाषी आहेत) हे ऐकून श्रोते खरेच आश्चर्यचकित झाले. हिंदू आणि कोरियन यांच्यातील चालीरीतींचे साम्यही त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. त्यांनी एक कथाही सांगितली. माता लक्ष्मी या भारतीय राजकन्येने . . ४८ मध्ये कोरियाचा राजा किम् सुरो याच्याशी विवाह केला होता. आजचे कोरियन त्यांची संतती आहे. रविकुमारांनी कोरियात राहणार्या भारतीयांनाही उपदेश केला की, त्यांनी कोरियन जनतेशी सार्थक संपर्क सतत वाढवीत जावा.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन, डांग सेऊल विद्यापीठात योगाचे अध्यापन करणारे प्राध्यापक डॉ. अभिजित घोष यांनी केले होते.

... ...

राष्ट्रीय उत्पन्नाची जडणघडण

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप त्याच्या जीडीपी (सकल घरगुती उत्पादन) मध्ये केले जाते. कृषिक्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे याचे तीन भाग आहेत. राष्ट्रीय उत्पादनाची जडणघडण या तीन क्षेत्रांच्या एकत्रित सहभागातून होते.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी कृषिप्रधानअसणारा आपला देश आता सेवाप्रधानराष्ट्र बनले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या जडणघडणीत मागच्या दशकांत घडलेले बदल पुढील तक्त्यातील आकडेवारीत प्रतिबिंबित झालेले दिसतात.
क्र.
वर्ष
कृषिक्षेत्र %
उद्योग क्षेत्र %
सेवा क्षेत्र %
एकूण
१९५०-५१
५३.
१६.
३०.३
१००
१९६०-६१
४८.
२०.
३०.
१००
१९७०-७१
४२.
२४.
३३.
१००
१९८०-८१
३६.
२५.
३८.
१००
१९९०-९१
२९.
२७.
४२.
१००
२०००-०१
२२.
२७.
५०.
१००
२०१०-११
१४.
२७.
५७.
१००
२०११-१२
१३.
२७.
५९.
१००

(संदर्भ : बिझिनेस लाईन, एप्रिल २०१२)

वरील आकडेवारीतून भारतीय कृषिक्षेत्राची सतत घसरण झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात कृषिक्षेत्राने दुष्काळाची काही वर्षे सोडली, तर सतत कासवगतीने का होईना पण प्रगती केलेली आहे. अर्थात उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या मोठ्या वाढीमुळे एकूण जीडीपीमधला कृषिक्षेत्राचा वाटा घसरलेला दिसतो. दीर्घकालीन आकडेवारीनुसार कृषिक्षेत्र कायम वाढ नोंदवताना दिसते.
उद्योगक्षेत्राने केलेली वाढ मात्र अल्पकाळात मोठे चढ-उतार दर्शविणारी आहे. १९५०-५१ ते १९६०-६१ या दशकात % असणारी वाढ १९७०-७१ ते १९८०-८१ या दशकात .% पर्यंत घटली आहे. तर १९९०-९१ ते २०००-०१ या जागतिकीकरणाच्या पहिल्या दशकात ती ऋण होऊन दशकभरात -.% एवढी नोंदवली गेली आहे.
सेवा क्षेत्राची वाटचाल कायम प्रगतीची राहिली आहे. त्यातही आयटी क्षेत्राच्या उदयानंतर या क्षेत्राने प्रत्येक दशकात ते % वाढ नोंदवली आहे.
अर्थात सेवा क्षेत्राच्या उत्पन्नात वाढ होऊन त्या प्रमाणात त्या क्षेत्रात रोजगार मात्र निर्माण झालेला नाही. तसेच कृषिक्षेत्राचा उत्पन्न वाटा घसरूनही त्यावर अवलंबून असणार्या लोकसंख्येचे प्रमाण कमी झालेले नाही. यामुळे देश श्रीमंतझाला असला तरी मोठी जनता मात्र दारिद्र्य रेषेखालीच जगताना दिसत आहे.

(विकल्पवेध, ते १५ मे च्या अंकावरून)


-मा. गो. वैद्य
babujivaidya@gmail.com

नागपूर,
दि. ०२-०६-२०१२

No comments:

Post a Comment