Friday 3 August 2012

आसामातील हिंसाचार : एक स्थायी उपाय



रविवारचे भाष्य दि. ऑगस्ट २०१२ करिता


आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात उसळलेला हिंसाचार तूर्तास थांबला आहे. तूर्तासहा शब्द महत्त्वाचा आहे. तो केव्हा पुन: उफाळेल याची खात्री नाही. दोन्ही बाजूकडचे लाखो लोक निर्वासित शिबिरांमध्ये राहत आहेत. गावेची गावे बेचिराख झालेली आहेत.

फरक
या हिंसाचारातील एक बाजू बोडोनावाच्या जनजातीची आहे, तर दुसरी बाजू बांगला देशातून अवैध रीत्या आसामात घुसलेल्या मुस्लिम घुसखोरांची आहे. हिंसाचार किती भीषण असेल, याचा अंदाज, प्रथम प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग आणि नंतर लगेच गृहमंत्री (अर्थात् पूर्वीचे) पी. चिदम्बरम् यांनी या हिंसाग्रस्त भागाला दिलेल्या भेटीवरून, बांधता येऊ शकतो. आणखी असाही अंदाज करता येऊ शकतो की, या हिंसाचारात, जीवित वित्त या दोन्ही बाबींमध्ये मुसलमानांची हानी अधिक झाली असावी. बोडोंची हानी अधिक असती, आणि मुसलमान वरचढ ठरले असते, तर प्रधानमंत्री आणि गृहमंत्री तातडीने तिकडे धावून नक्कीच गेले नसते. १९८९ मध्ये काश्मीरच्या खोर्यातून - लाख हिंदू पंडितांवर निर्वासित होण्याचा कठीण प्रसंग गुदरला होता. या पंडितांवर अत्याचार करून त्यांना पलायन करावयाला लावणार्यांत स्थानिक मुस्लिमांचाच हात होता, हे वेगळेांगायला नकोच. गेला काय कोणता प्रधानमंत्री त्यांचे अश्रू पुसण्यासाठी धावून? किंवा उचललीत काय तत्कालीन गृहमंत्र्यांनी हल्लेखोरांना नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले? नाव नको. त्यावेळी विश्वनाथ प्रतापसिंग प्रधानमंत्री होते आणि मुफ्ती महमद सईद गृहमंत्री होते. त्यांची सत्ता फार काळ टिकली नाही, हे खरे. १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. केली काय त्यांनी तरी या निर्वासितांची वास्तपुस्त? ते तर चांगली पाच वर्षे प्रधानमंत्री होते. पण त्यांनी आपल्या कार्यकाळात ना त्यांच्या स्वगृही पुनर्वसनासाठी काही केले, ना त्या निर्वासितांना दिलासा देण्यासाठी निर्वासितांच्या छावण्यांना भेटी दिल्या. कारण, या प्रकरणात अन्यायग्रस्त अत्याचारपीडित हिंदू होते. ते मुसलमान असते तर या बड्या मंडळींचे वेगळे आचरण दिसले असते. आणि ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे. कारण, मुसलमानांची जशी मजबूत मतपेढी आहे, तशी हिंदूंची नाही. हिंदू अनेक प्रकारांमध्ये विभक्त आहेत.

क्रिया-प्रतिक्रिया
तात्पर्य हे की, कोक्राझार जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरातही मुसलमानांची जीवित वित्त यांची हानी अधिक झाली. पण हे मुसलमानांना प्रतिक्रियेच्या स्वरूपात भोगावे लागले. हिंसक क्रिया त्यांच्या हातून प्रथम घडली आणि मग बोडो जनजातीकडून तिखट प्रतिक्रिया उद्भवली. आपल्या देशात एक विचित्र सेक्युलर मानसिकता बनलेली आहे. ही मानसिकता मूलत: कारणीभूत असलेल्या क्रियेला विसरून जाते आणि प्रतिक्रियेवरच टीकेची झोड उठविते. बहुचर्चित गोध्रा कांडाचे उदाहरण घ्या. पहिली कृती मुसलमानांकडून घडली. ५७ हिंदू कारसेवकांना आगगाडीच्या डब्यात कोंडून त्यांना जिवंत जाळून ठार करण्यात आले. त्याची अकल्पित तीव्र प्रतिक्रिया गुजरातच्या अन्य भागांत घडली. गुजराती माणूस शामळू असतो, अशी त्याची देशभर प्रतिमा आहे. पण तोही गोधर्याच्या अमानुष अत्याचाराने पेटून उठला. आणि कोणते ओले आणि कोणते सुके याचा विवेक गमावून त्याने त्या अत्याचाराचा सूड उगविला. मला नाही वाटत, कोणतेही सरकार वा कोणताही राजकीय पुढारी लगेच संपूर्ण राज्यातील जनतेला पेटवू शकतो. जनताच पेटली. आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अपराध्यांना शिक्षा ठोठावली जात आहे. त्याच्या बातम्याही ठळकपणे प्रकाशित प्रसारित केल्या जात आहेत. पण त्या ५७ निरपराध कारसेवकांना, ज्यांनी चालती गाडी थांबवून जिवंत जाळले, त्यांच्यावरील खटल्याची बातमी आपण ऐकली आहे काय? नक्कीच त्या कृत्यातील गुन्हेगारांवर खटले चालले असतीलच. त्यांच्या खटल्याच्या निकालाची बातमी का पसरत नाही? ते गुन्हेगार मुसलमान आहेत म्हणून? प्रसारमाध्यमांनीच याचे उत्तर दिले पाहिजे.

घुसखोरी
हे जरा विषयांवर झाले. आपला आजचा विषय आहे कोक्राझारमधील हिंसाचार. बोडो एवढे का संतापले? तसे ते पूर्वीही संतापले होते. पण मुसलमानांवर नाही. आसामच्या सरकारवर. त्यांना त्यांची बहुसंख्या असलेला भाग आसामपासून अलग केलेला हवा होता. यासाठी त्यांची एक संस्थाही स्थापन झाली होती. बोडो लिबरेशन टायगर्सअसे त्या संस्थेचे नाव. पण वाटाघाटींनी तो प्रश् निकालात काढण्यात आला. २००३ मध्ये समझोता झाला. या समझोत्यान्वये बोडो टेरिटोरियल कौन्सिल’ (बोटेकौ)ची स्थापना करण्यात आली आणि तिला काही विशेष अधिकारही देण्यात आले. बोटेकौमध्ये अर्थात्च बोडोंचे वर्चस्व राहणार. पण हे वर्चस्व, या प्रदेशातील मुसलमानांना सहन होत नाही. या बोडोलॅण्डच्या प्रदेशात काही स्थानिक मुसलमानही आहेत. त्यांच्यात आणि बोडोत झगडा नाही. नव्हता, असे म्हणणे कदाचित अधिक योग्य ठरेल. पण तेथे बांगला देशातून मुसलमान फारोठ्या संख्येत घुसखोरी करून आले आहेत. या घुसखोरांनी तेथील वातावरण बिघडविले आहे.

सत्तालालची
या मुस्लिम घुसखोरांनी जवळजवळ ३५ टक्के सरकारी खासभूमीवर अतिक्रमण केले आहे. सरकार त्यासंबंधी काहीही करत नाही. आसामचे मुख्य मंत्री तरुण गोगोई यांचे एक निर्लज्ज विधान अनेकांना स्मरत असेलच. गोगोई म्हणाले होते की, आसामात कुणीही अवैध घुसखोर नाही. सर्व आसामातलेच आहेत. गोगोईंना विचारले पाहिजे की, आसामच्या २७ जिल्ह्यांपैकी ११ जिल्हे मुस्लिमबहुल कसे झालेत? १५ ऑगस्ट १९४७ लाच ते मुस्लिमबहुल होते काय? पूर्वीच्या आसामचा एक सिल्हट जिल्हा मुस्लिमबहुल असल्याचा संशय होता. तेथे जनमतसंग्रह घेण्यात आला; आणि बहुमत पाकिस्तानच्या बाजूने पडले. तो जिल्हा पाकिस्तानात- तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगला देशात- समाविष्ट करण्यात आला. आणखी कोणताही जिल्हा मुस्लिमबहुल असता, तर पाकिस्तानी नेतृत्वाने तो भारतात राहू दिला असता काय? गोगोईंनी उत्तर दिले पाहिजे की, बांगला देशाच्या सीमेला लागून असलेले हे अकरा जिल्हे मुस्लिमबहुल कसे झाले? पण ते उत्तर देणार नाहीत. अल्पसंख्य मुस्लिमांच्या व्होटबँकेवर त्यांची सत्ता अवलंबून आहे. आणि ही मंडळी इतकी स्वार्थी आणि सत्तालालची आहे की, त्यापायी देशहितावरही निखारा ठेवायला कमी करावयाची नाही.

ठिणगी
तर काय? समस्या बांगलाभाषी मुस्लिम घुसखोरांची आहे. त्यांचे गार्हाणे हे आहे की, ‘बोटेकौ त्यांचे वर्चस्व नाही. बोडोंचे वर्चस्व आहे. पण ते तर राहणारच. ज्या घुसखोरांचे सात्म्य (assimilation) झाले आहे, त्यांना नागरिकत्वाचे अधिकार आहेतच. पण तेवढ्यावरच ते समाधानी नाहीत. भांडणाचे मूळ हे आहे. आणि २००८ पासून या भांडणाने गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. अर्थात् आक्रमण मुसलमानांकडूनच प्रारंभ झाले आहे. ऑल बोडो स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार यु. जी. ब्रह्म सांगतात की, गेल्या दोन वर्षांमध्ये २०० बोडोंची कत्तल झाली आहे. गोगोईसाहेब, आपणच सांगा ही कत्तल कुणी केली? बोडोंनीच बोडोंना मारले काय? की बोडोबहुल प्रदेशात जे अगदी थोडे जनजातीचे लोक आहेत, त्यांनी या बोडोंना ठार केले? उत्तर साफ आहे. धाक जमविण्यासाठी मुस्लिमांनीच त्यांची कत्तल केली. गेल्या जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी जो हिंसाचार माजला, त्याचेही मूळ मुसलमानांच्या आक्रमक स्वभावात आहे. घटना २० जुलैची आहे. प्रदीप बोडो आणि त्याचे तीन मित्र कोक्राझारमधून नरबाडी या मुस्लिमबहुल भागातून जात होते. बोडो आणि मुस्लिम घुसखोर यांच्यात तणावाचे वातावरण होतेच. म्हणून प्रदीप बोडोच्या पत्नीने आपल्या पतीला सावध करीत म्हटले की, तिकडून आपण जाऊ नका. पण प्रदीपने तिचे ऐकले नाही. रात्री .३० ला बातमी आली की प्रदीप त्याचे तीन मित्र यांची हत्या करण्यात आली. प्रथम त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. लगेच पोलिस आले. या चौघांना घेऊन ते जात होते. तर मुस्लिम जमावाने पोलिसांची गाडी अडविली, या चौघांना त्यातून बाहेर काढले आणि त्यांच्यावर कुर्हाडीने वार करून त्यांना संपविले.

सूड-प्रतिक्रिया
याची संपूर्ण कोक्राझार जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरातही तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रथम तर मुसलमानांना ही संधी वाटली आणि त्यांनी बोडो वस्त्यांवर आक्रमण करून बोडोंची अनेक घरे जाळली. काही बोडोंनी प्रतिकार केला, तर त्यांना ठार करण्यात आले. मग बोडोंनी उलट हल्ले सुरू केले. गोसाईगांव येथे बोडो निर्वासितांचे एक शिबिर आहे. त्यात ३४१९ निर्वासित सध्या राहत आहेत. या शिबिराचा मुख्य रूपक बसुमतराय सांगतो की, आमचेच शेजारी जेव्हा आमची घरे जाळत असलेले आम्ही बघितले, तेव्हा आम्हीही सूड घेण्याचे ठरविले आणि त्या मुस्लिम वस्त्यांवर आमच्याही लोकांनी हल्ले करणे सुरू केले. आमच्या लोकांनी त्यांचीही घरे जाळणे प्रारंभ केले. या प्रतिक्रियेमुळे मृतांमध्ये आणि निर्वासितांमध्येही मुसलमानांची संख्या अधिक आहे. म्हणून मग कॉंग्रेस सरकारला चेव आला आणि प्रधानमंत्री गृहमंत्री यांच्या दौर्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मदतीला गेलेल्या सुरक्षा दलांनी हिंसाचार थांबविला. सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे. मात्र बोडो आता म्हणू लागले आहेत की, मुसलमानांना आपले शेजारी म्हणून स्वीकारण्याची आमच्या मनाची तयारी नाही. या शेजार्यांनीच आमची घरे जाळली.
अर्थात्, कालांतराने या क्षुब्ध भावना शांत होतील. प्रतिकाराची एवढ्या मोठ्या आघाताची मुस्लिमांनीही कल्पना केली नसेल. तेही नीट वागू लागतील. बोटेकौ बोडोंचे वर्चस्व राहणार हेही ते मान्य करतील आणि निदान कोक्राझार त्याचा परिसर यात पुन: शांततेचे वातावरण निर्माण होईल. कुणीही अशीच इच्छा करील.

धोका
पण मूळ अवैध घुसखोरीचा प्रश् मात्र तसाच राहणार आहे. या घुसखोरांची संख्याही वाढत आहे आणि संख्येबरोबरच त्यांची हिंमतही वाढत आहे. आसामात त्यांनी आपला एक वेगळा राजकीय पक्षही बनविला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटअसे त्याचे निरुपद्रवी नाव आहे. पण तो फक्त मुस्लिमांचा पक्ष आहे. आज आसामच्या विधानसभेत, सत्ताधारी कॉंग्रेसच्या खालोखाल या पक्षाच्या आमदारांची संख्या आहे. भाजपा तिसर्या क्रमांकावर आहे. ही घुसखोरी अशीच चालत राहिली - आणि ती कॉंग्रेस पक्षाच्या मतपेढीच्या खुशामतीच्या राजकारणाने निश्चितच वाढणार आहे- तर उद्या त्यांची सत्ताही स्थापन होऊ शकते.

स्थायी उपाय
यावर उपाय? एक स्थायी उपाय आहे. हे घुसखोर बांगला देशातून येतात. कारण तेथे भूमी कमी आणि लोकसंख्या अधिक आहे. जाणकारांना हे माहीत असेल की, १९४७ साली निर्माण झालेल्या संपूर्ण पाकिस्तानात, पूर्व पाकिस्तानची म्हणजेच आजच्या बांगला देशाची लोकसंख्या अधिक होती. पण संपूर्ण पाकिस्तानची सत्तासूत्रे पूर्व भागाकडे जाऊ नयेत, म्हणून या पूर्व भागाचे लोकप्रिय नेते मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानच्या लष्करशाही सरकारने तुरुंगात टाकले होते आणि त्यातूनच पूर्व पाकिस्तान विरुद्ध पश्चिम पाकिस्तान असा रक्तरंजित संघर्ष निर्माण झाला. या संघर्षात, भारत पूर्व पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाले. तोच आजचा बांगला देश होय. आज बांगला देशची लोकसंख्या १५ कोटी, तर . पाकिस्तानची १७ कोटी. बांगला देशची लोकसंख्या कमी का झाली? कारण आहे ते भारतात आलेत म्हणून. बांगला देशाचे क्षेत्रफळ जवळपास दीड लाख चौ. कि. मी. आहे, तर पाकिस्तानचे सुमारे लाख चौ. कि. मी. आहे. बांगला देशच्या भूमीवर लोकसंख्येचे दडपण आहे. त्यामुळे, तेथील लोक भारतात घुसखोरी करीत आहेत. स्थायी उपाय हा की, बांगला देशाने भारतात विलीन व्हावे. ज्या भाषेच्या मुद्यावरून . पाकिस्तानशी त्यांचा संघर्ष झाला, त्या भाषेला भारतात नक्कीच सन्मान मिळेल. कारण भारतातील . बंगालमधील जनतेची ही भाषा बंगालीच आहे. मुसलमानांची संख्या अधिक असल्यामुळे, तेथील मुख्य मंत्री स्वाभाविकपणे मुसलमानच राहील. म्हणजे शासन त्यांचेच राहील. एकदा भारतात विलीनीकरण झाले की अवैध घुसखोरीचा प्रश्नच राहणार नाही. ते मोकळ्या मनाने कुठेही राहू शकतील. भारत पंथनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे आपल्या धर्ममताप्रमाणे आचरण करण्याच्या स्वातंत्र्याची कायमची हमी राहील. संरक्षणावरील खर्च कमी होऊन तो पैसा विकासाच्या कार्यासाठी खर्चरता येईल. आणि भारताचीही पूर्व सीमा सुरक्षित होईल. असे लाभच लाभ आहेत. बांगला देशात सध्या तरी लोकशाही आहे. तेव्हा तेथील जनतेनेच या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा, असे वाटते.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०४-०८-२०१२

No comments:

Post a Comment