Saturday 6 October 2012

इतस्ततः


रविवारचे भाष्य दि. ७ ऑक्टोबर २०१२

'लव्ह जिहाद'साठी मुस्लिम प्रोत्साहन

'मुस्लिम यूथ फोरम' या नावाने मुस्लिम सुशिक्षित तरुणांना लव्ह जिहादचे उघड आवाहन सुरू झाले आहे. याविषयी निघालेल्या पत्रकात हिंदू, शीख, ख्रिस्ती तरुणींना प्रयत्नपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्याचे जाहीर आवाहन केले आहे. याकरिता बक्षिसांच्या रकमाही जाहीर केल्या आहेत.
बक्षिसांचे दर असे-
हिंदू (ब्राह्मण मुलगी)          :    ५ लाख
हिंदू (क्षत्रिय मुलगी)          :    ४.५ लाख
हिंदू (दलित, भटके इ. मुली)    :    २ लाख
जैन मुलगी                  :    ३ लाख
गुजराती (ब्राह्मण मुलगी)       :    ६ लाख
गुजराती (कच्छी मुलगी)       :    ३ लाख
पंजाबी (शीख मुलगी)          :    ७ लाख
पंजाबी (हिंदू मुलगी)           :    ६ लाख
ख्रिश्चन (रोमन कॅथॉलिक)       :    ४ लाख
ख्रिश्चन (प्रोटेस्टंट)              :    ३ लाख
बौद्ध मुलगी                   :    १.५ लाख

संपर्कासाठी वेबसाईट :
www.rangonoor.com, www.irf.net, www.fathufgawwad.com
ई मेल : love.jihad@yahoo.com, salim786@gmail.com

संस्था : इस्लामिक इंटरनॅशनल स्कूल
०२२-२३७३६८७५, २३७३०६८९
जमात-उद-दावा : +९२५१२२५६१६१, ९२३२१५२१३११९
व्यक्ती : जमशेद :  ९२२१३५०१४०४४
मोहम्मद चाँद :  ९२४२३७१२०७१५, ९२३००५२७७२३३
     रेहान : +९२४२३६६०५८१
     हुसैन :   ९७१५५९९४६३७७/३८९/९११/२२३/७८६
पत्ते : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियामुख्यालय : डेक्कन हाऊस, नं. ५, मेन १, ४ थी क्रॉस
एस. के. गार्डन, बेन्सन टाऊन पोस्ट, बेंगळुरू- ५६ ०० ४६
०८०-३२९५७५३४, फॅक्स : ०८०-२३४३०४३२
ई मेल : contact@popularfront.org, popularfrontmail@gmail.com
वेबसाईट : www.popularfrontindia.org

१ ला मजला, नमीदशा कॉम्प्लेक्स,
कब्बनपेट, बेंगळुरू-५६ ०० ०२
०८०-३२९८३६३९, ई मेल : contactkfd@gmail.org
३२/२३, ५ वा मजला, मॉडर्न टॉवर,
वेस्ट कॉट रोड, रोयापेट्टा, चेन्नई-६० ०० १४
०४४-६४६११९६१, ई मेल : in@popularfrontindia.org
युनिटी हाऊस, राजाजी रोड,
कोझिकोडे - ६७ ३० ०४
०४९५-२७२३४४३, ई मेल : ndfkeralam@gmail.com
जिज्ञासूंनी अधिक माहिती मिळवावी. मामला गंभीर आहे. देशातील सुरक्षाव्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रशासन आदी संस्था याची दखल घेतील काय? की हिंदू समाजालाच काही उपाययोजना करावी लागेल?
(साप्ताहिक 'विजयन्त' सांगली वरून साभार)
***   ***   ***

भारतीय कुष्ठ निवारण संघ
छत्तीसगडमध्ये बिलासपूरच्या पुढे चांपा नावाचे एक नगर आहे. अलीकडे ते जिल्ह्याचे ठिकाणही झाले आहे. तेथे, भारतीय कुष्ठ निवारण संघ, या नावाची, महारोग्यांची सेवा करणारी संस्था आहे.
सदाशिव गोविंद कात्रे यांनी ही संस्था स्थापन केली. वर्ष होते १९६२. कात्रे स्वतः कुष्ठरोगी होते. रेल्वेत कर्मचारी होते. ते एका ख्रिस्ती मिशनरी दवाखान्यातून रोगमुक्त झाले. त्यांनी तेथे रोगमुक्तीबरोबरच ख्रिस्ती धर्मप्रचार व प्रसार कसा चालतो हे बघितले होते. त्या वेळचे सरसंघचालक प. पू. श्रीगुरुजींशी कात्रे यांचा घनिष्ठ परिचय होता. श्रीगुरुजींच्याच प्रेरणेने त्यांनी भारतीय कुष्ठ निवारण संघाची स्थापना केली.
या संस्थेची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ती अशी-
१) येथे कुष्ठरोग्याची जात, संप्रदाय यांचा विचार न करता, सर्वांवर उपचार केला जातो. सध्या येथे १३६ रोगी आहेत, त्यात ८६ म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक महिला आहेत.
२) हा संघ आपल्या कार्याचा गाजावाजा करीत नाही. त्याची कुठेही जाहिरात नसते. त्याचा प्रचार-प्रसार करणारे तेच लोक असतात, ज्यांनी येथे उपचार घेऊन रोगमुक्ती प्राप्त केली. या संस्थेला आर्थिक दान देणार्‍यांमध्येही येथून रोगमुक्त झालेलेच अधिकांश असतात.
३) हा कुष्ठ निवारण संघ मुख्य चार गोष्टींवर भर देत असतो. (अ) रोग्यांवर उपचार (आ) त्यांचे पुनर्वसन (इ) त्यांचे शिक्षण आणि (ई) स्वावलंबन.
४) सर्व रुग्णांना निःशुल्क भोजन, कपडे आणि औषधे दिली जातात. काही रोगी आपल्या कुटुंबांसोबतही राहात असतात.
५) रुग्णांना ऍलोपॅथीबरोबरच होमिओपॅथीचीही औषधे दिली जातात. डॉ. ध्रुव चक्रवर्ती होमिओ उपचार करतात. त्यांचे म्हणणे असे की, ऍलोपॅथीच्या औषधांनी रोग तर बरा होतो, पण महारोगामुळे झालेल्या जखमा पूर्णपणे बर्‍या होत नाहीत. होमिओ औषधांमुळे सध्या १५ टक्के रुग्णांच्या जखमा पूर्णपणे बर्‍या झाल्या आहेत.
६) भा. कु. नि. संघ रुग्णांच्या निरोगी मुलांसाठी एक विद्यालय व एक वसतिगृहही चालवितो. ही मुले छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, म. प्र. आणि उ. प्र.तील आहेत. छात्रावासात राहणार्‍या मुलांची संख्या सध्या ११० आहे, तर विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या १५१ आहे.
७) संस्थेची एक गोशाळाही आहे. ती पंजीयित आहे. तिला सरकारी अनुदानही मिळते. सध्या गोशाळेत १२० जनावरे आहेत. त्यांच्या शेणापासून जैविक खते आणि बायोगॅसही तयार केला जातो. याशिवाय रुग्णांवरील उपचारासाठी गोमूत्राचाही प्रयोग करणे सुरू झाले आहे.
८) संघाजवळ स्वतःची ७० एकर जमीन आहे. सुमारे ३५० लोकांकरिता- जे येथे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आणि संघाचे कार्यकर्ते राहतात- या शेतीतून पुरेसे धान्य उत्पादन होते.
९) सन २००४ मध्ये छत्तीसगड सरकारकडून भा. कु. नि. संघाला महाराजा अग्रसेन या नावाचा पुरस्कार मिळाला. त्यावेळचे प्रधानमंत्री श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला होता.
१०) हा सारा परिसर आता 'कात्रे नगर' या नावाने ओळखला जातो. हे एक नवे नगरच झाले आहे. चांप्याचे एक प्रसिद्ध उपनगर; आणि त्याचे 'कात्रे नगर' हे नावही पूर्णतः यथार्थ आहे.
***   ***   ***
बिना हाताचा कारागीर
तामीळनाडूत तिम्माचंद्र या नावाचे एक लहानसे गाव आहे. तेथे तिमारायप्पा नावाचा ४५ वर्षांचा गृहस्थ राहतो. तो या भागात खूप लोकप्रिय आहे. आणि त्याच्या लोकप्रियतेचे कारण त्याचे सुतारकामातील कौशल्य हे आहे. कुणी म्हणेल की, यात काय विशेष आहे? विशेष हे आहे की तिमारायप्पाला जन्मापासूनच हात नाहीत. पण तो त्यांच्या मदतीशिवाय शेतीसाठी उपयुक्त अवजारे तयार करतो. त्याची थोडी शेतीही आहे. तो स्वतः त्या शेतीवर राबतो. झाडांसाठी खड्डे खणणे, झाडे तोडणे, नारळाच्या झाडावर चढणे इ. सर्व कामे तो करतो. पण फक्त आपल्या पायांच्या भरवशावर. नवल म्हणजे त्याचे लग्नही झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव धीमाक्का आहे. लग्नाच्या वेळी, भटजी त्याला म्हणाले की, मंगळसूत्राचे एक टोक तू आपल्या तोंडात धर, दुसरे टोक भटजी धरतील व मंगळसूत्र पत्नीच्या गळ्यात घातले जाईल. पण तिमारायप्पाने ते कबूल केले नाही. त्याने आपल्या पायांनी ते मंगळसूत्र नवरीच्या गळ्यात घातले!
(३ सप्टेंबर २०१२ च्या 'डेक्कन क्रॉनिकल' या वृत्तपत्राच्या आधारे)
***   ***   ***
इटालियन संस्कृत पंडित
नुकतेच म्हणजे ३ ऑगस्टला पुदुचेरी (जुने पाँडेचेरी) येथील वेद पाठशाळेत एक दीक्षा समारंभ झाला. दीक्षा म्हणजे हिंदू धर्माची दीक्षा. दीक्षा घेणारे हे सर्व २३ ही जण इटलीतील होते. मुख्य म्हणजे कॅथॉलिक चर्चचे सर्वश्रेष्ठ अधिकारी जे पोप, त्यांच्या राजधानीतले- व्हॅटिकन'चे होते.
हा दीक्षाविधी तीन तास चालला; आणि मंत्र म्हणणारे इटॅलियनही होते.
हे घडायला एक कारण झाले. फ्लॅवियो नावाचा एक इटॅलियन गृहस्थ, हिंदूंच्या जीवनशैलीमुळे प्रभावित झाला. तो २००१ मध्ये राजा शास्त्रीगल यांच्या संपर्कात आला. शास्त्रीगल व्हॅटिकनला गेले; आणि तेथे ते तीन महिने राहिले. त्या तीन महिन्यांत त्यांनी फ्लॅवियो आणि त्यांची पत्नी स्टॅपेनो यांना संस्कृत शिकविले. वेदातील ऋचांचे पठनही शिकविले. नंतर १०-११ वर्षांमध्ये या जोडप्याने अनेक अनुयायी मिळविले. तेही हिंदूंच्या अध्यात्मविद्येने प्रभावित झाले.
या दीक्षा समारंभात थोडेच लोक उपस्थित होते. पण या इटॅलियनांनी रुद्र चमक, रुद्र जप, श्रीसूक्त या सर्वांचे जे शुद्ध पारंपरिक पद्धतीचे पठन सादर केले, त्याने ते सर्व चकित झाले. फ्लॅवियो आणि स्टॅपेनो यांनी आपली मूळ नावेही बदलली आहेत. ते आता अनुक्रमे चिदानंद सरस्वती आणि सावित्री झालेले आहेत.
***   ***   ***
'शक्तिसुरभि'- कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राचा उपक्रम
कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र आपल्या शैक्षणिक व सेवा प्रकल्पांविषयी प्रसिद्ध आहे. पण या वेळी त्या केंद्राचे स्मरण होण्याचे कारण कचर्‍यातून बायोगॅस तयार करणारा प्लँट त्यांनी तयार केला हे आहे.
या प्लँटचे नावही सुरेख आहे 'शक्तिसुरभि'. शक्तीचा सुगंध असा त्या नावाचा अर्थ होतो. जवळजवळ २५ वर्षे, केंद्राने या प्रयोगावर कष्ट घेतले आहेत. जेवल्यानंतर उरलेले अन्न-शाकाहारी तसेच मांसाहारी, भाज्यांची देठे वगैरे टाकाऊ भाग, पिठाच्या गिरण्यातून फेकून दिला जाणारा माल, निंब, जट्रोफा अशा अखाद्य तेलांची ढेप, हे साधारणतः या प्रकल्पात वापरले जातात. एक घन मीटरचा प्लँट तयार करण्यासाठी साधारणतः ५ किलो कचरा लागतो; व त्यापासून .४३ किलो इतका गॅस मिळतो.
बायोगॅस म्हणजे जैविक गॅस ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. परंतु, त्याच्या उभारणीचा खर्च आणि शेणाच्या पूर्तीची समस्या या कारणांमुळे, ती लोकप्रिय होऊ शकली नाही. 'शक्तिसुरभि'साठी आवश्यक असणारा कच्चा माल खूपच स्वस्त किमतीत मिळतो. पण स्वस्त किंमत एवढाच त्याचा गुण नाही. सडणारा जो कचरा आहे, त्याचा निपटाराही हे प्लँट करतात. दुर्गंध अजीबात येत नाही व माशांचाही उपद्रव नसतो. गॅस निघाल्यानंतर जो द्रव उरतो त्याचे उत्तम खतही होते. 'शक्तिसुरभि'चा हिशेब असा आहे. १०० घन मीटरचा बायोगॅस प्लँट ५ किलोवॅट ऊर्जा उत्पन्न करील आणि एका कुटुंबाला, त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी, वीस तास ती ऊर्जा उपलब्ध असेल.
***   ***   ***
अबब-१

दहा मिनिटांत २५ हजार पोळ्या!
हो! १० मिनिटांमध्ये २५ हजार पोळ्या तयार करण्यात आल्या! कुठे म्हणता? - तर गुजरातमधील कवडीबाई कन्या विद्यालयात! कोणी बनविल्या? तर त्या विद्यालयाच्या १२०० विद्यार्थिनींनी!
त्याचे असे झाले. एक पालक आपल्या मुलीला शाळेत भरती करण्यासाठी आले. ते मुख्याध्यापिकांना भेटले. ते म्हणाले, ''आपली शाळा छान आहे. माझी मुलगीही हुशार आहे. तिला ८६ टक्के गुण मिळाले आहेत. परंतु, तिला स्वयंपाकाबाबत अजीबात आवड नाही. आम्ही मुलींचे पालक त्यांच्या शिक्षणाने खुष होतो. पण लग्न झाल्यानंतर त्यांना साधा स्वयंपाकही करता आला नाही, तर त्यांची पंचाईत होते. आपण यातून काही तरी मार्ग काढा.''
मुख्याध्यापिकेने त्यांचे म्हणणे मनावर घेतले. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना सांगितले की, तुम्ही आपल्या घरी पोळ्या कशा तयार केल्या जातात, हे शिकून या. मुली शिकल्या. आणि मग एका दिवशी १२०० ही मुलींची परीक्षा घेण्यात आली.
प्रत्येक विद्यार्थिनीला २५० ग्रॅम कणीक देण्यात आली. पोळीची गोलाई ५ ते ७ इंच ठेवायला सांगितले. वेळ दहा मिनिटे देण्यात आला. त्या वेळात १२०० विद्यार्थिनींनी २५ हजार पोळ्या केल्या. यासाठी ३ क्विंटल कणीक व १० किलो तूप लागले. एवढ्या पोळ्यांचे शाळेने काय केले म्हणता?- तर आपल्या शहरातील दवाखान्यांमध्ये भरती असलेल्या रुग्णांना त्या वाटण्यात आल्या. आहे की नाही दखल घेण्यासारखी ही घटना!
अबब-२
५३ कोटी पुस्तकांची विक्री
५३ कोटी पुस्तकांची विक्री एका प्रकाशन संस्थेने केली. एका वर्षात नव्हे बरे! ९० वर्षांमध्ये. कारण ती संस्था स्थापन होऊन ९० वर्षे झाली आहेत. दरवर्षीच्या विक्रीचा आपण सरासरी हिशेब काढू शकू. पण तो चुकीचा ठरू शकतो. कारण गेल्या एक वर्षातच अडीच कोटी पुस्तकांची विक्री झाली.
या प्रकाशन संस्थेचे नाव आहे 'गीता प्रेस, गोरखपूर'. आपली म्हणजे हिंदूंची धार्मिक पुस्तके मुद्रित करणे व विकणे हे गीता प्रेसचे ध्येय आहे. केवळ नफा कमाविणे हे ध्येय नसल्यामुळे, बाजारभावाच्या तुलनेत ती खूप स्वस्त असतात. संस्था, आपल्या पुस्तकांची जाहिरात करत नाही. पण तिचे कर्तृत्व आता सर्वपरिचित झाले आहे.
सर्व कर्मचार्‍यांसाठी एक साधा नियम आहे. कामाला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी हातपाय धुवून घेतले पाहिजेत आणि प्रथम सर्वांनी 'रामधून' म्हटली पाहिजे. त्यानंतरच कामाला प्रारंभ. गेल्या ९० वर्षांपासून हा नियम पाळला जात आहे.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०६-१०-२०१२

No comments:

Post a Comment