Friday 11 January 2013

हिंदू संस्कृती आणि स्त्री-पुरुष संबंध


रविवारचे भाष्य दि. १३ जानेवारी २०१३ करिता


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांच्या दोन वक्तव्यांना काही प्रसारमाध्यमांनी विकृत रूप देऊन, त्यांची आणि पर्यायाने संघाची निंदा करण्याची हौस पुरवून घेतली. नंतर, त्यापैकी अनेकांना पश्‍चात्ताप झाला आणि त्यांनी क्षमायाचनाही केली. हे तसे चांगलेच झाले. श्री. भागवत यांचे एक वक्तव्य आसामातील सिल्चरचे होते, तर दुसरे मध्यप्रदेशातील इंदूरचे. सिल्चरच्या वक्तव्यात एक वाक्य होते की, बलात्काराच्या घटना इंडियातअधिक घडतात; ‘भारतातकमी घडतात. इंडियाम्हणजे शहरे आणि भारतम्हणजे ग्रामीण भाग- असा अर्थ प्रसारमाध्यमांनी केला. तो श्री. मोहनरावांना अभिप्रेत असेलच, असे नाही. त्यांना इंडियाया शब्दाने पाश्‍चात्त्य संस्कृतीने व सभ्यतेने अभिभूत झालेला विभाग आणि भारतशब्दाने आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीची मूल्ये पाळणारा भाग, हेच अभिप्रेत असावे.

संस्कृतीचे आदर्श
हे कुणी अमान्य करील काय की, पाश्‍चात्त्य संस्कृती म्हणा, सभ्यता म्हणा, भोगप्रधान आहे; तर हिंदू संस्कृती त्यागप्रधान आहे. हिंदूंच्या घरात भिंतीवर लटकविलेली चित्रेच बघा ना. कोणत्या पुरुषांची किंवा स्त्रियांची चित्रे दिसतील? त्यागी, पराक्रमी, सच्छील व्यक्तींची चित्रेच दिसतील. काही नाठाळांच्या अंत:करणात स्वामी विवेकानंदांचे चित्र पाहूनही विकृत विचार उत्पन्न झाले आणि त्यांनी त्या विकृत विचारांना शब्दरूप देऊन चेन्नईहून प्रकाशित होणार्‍या हिंदूया इंग्रजी दैनिकाच्या दिनांक ३ जानेवारीच्या अंकात ते प्रसिद्धही केले. संपादकांनाही आपल्या वृत्तपत्राच्या हिंदूया नावाच्या वैशिष्ट्यपूर्ण अर्थाचा विसर पडला असावा आणि त्यांनी तो लेख प्रकाशित केला. नंतर त्या लेखातील मतप्रदर्शनावर प्रखर टीका करणारी पत्रेही त्यांनी प्रकाशित केली व झाल्या प्रकाराबद्दल किंतु-परंतुकरीत खेदही प्रकट केला. हे पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांना धरूनच झाले. मला येथे हे अधोरेखित करावयाचे आहे की, विकृत व्यवहाराची अशी अपवादात्मक उदाहरणे बाजूला ठेवली आणि मोकळ्या निर्मळ मनाने विचार केला तर जी चित्रे आपल्या संस्कृतीच्या मूल्यांचे स्मरण व प्रेरणा देणारी असतात तीच भिंतीवर लटकविली जातात. पाश्‍चात्त्यांची घरे मी पाहिली नाहीत. पण तेथे संस्कृतिभक्तीपेक्षा किंवा मूल्यभक्तीपेक्षा देहभक्ती अधिक आढळते. या देहभक्तीची लाट आपल्याही देशात आली आहे. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर त्वचेला कोमलता प्राप्त करून देणार्‍या प्रसाधनांच्या जाहिराती, याची साक्ष देतील. आपल्याकडे संयमाचे गोडवे गायिले जातात, भोगाचे नाही. अशाच व्यक्ती आपल्या संस्कृतीचे आदर्श म्हणून अनुकरणीय मानल्या जातात.

धर्म-अविरोधी काम
याचा अर्थ भोगाला आपल्या समाजव्यवस्थेत स्थान नाही, असा नाही. स्त्रीपुरुषांच्या परस्परातील व्यवहाराला आपल्या येथे कामम्हटले आहे आणि चार पुरुषार्थांमध्ये त्याचाही अंतर्भाव आहे. प्राणिमात्रांमधील काम मी आहेअसे भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. पण त्या कामालाएक विशेषण लावले आहे. कोणतेही विशेषण वस्तूची व्याप्ती कमी करीत असते, हे सर्वमान्य आहे. श्रीकृष्णांनी जे विशेषण वापरले ते आहे धर्माविरुद्धम्हणजे धर्माशी अविरोधी. धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ (अध्याय ७, श्‍लोक ११) हे ते वचन आहे. म्हणजे कामाच्या पूर्तीसाठी, उपभोगासाठी धर्माचे म्हणजे नैतिकतेचे बंधन आहे. माज आला की तृप्ती करावयाची ही पशूंची प्रकृती आहे. माणूस या प्रकृतीच्या वर उठतो, आणि संस्कृतिसंपन्न आचरण करतो. कारणे कोणतीही असोत, सामाजिक दडपण म्हणा, कौटुंबिक आचरण म्हणा, याचा प्रभाव ग्रामीण भागात अधिक दिसून येतो. हे दडपण अनेकदा अन्यायालाही कारणीभूत होत असते. जसे हरयाणातील खापपंचायतीचे काही निर्णय. पण तेथे दडपण असतेच. धनसंपन्नतेने झगमगणार्‍या शहरात असे दडपण नसते. कुटुंब खेड्यात राहते, या कौटुंबिक चरित्रामुळे कुटुंब टिकते. शहरात कुटुंब तसे टिकत नाही. म्हणून तेथे वृद्धाश्रम आहेत. मी अनेक खेड्यांमध्ये हिंडलो. मला कुठेही वृद्धाश्रम दिसला नाही. माणूस नोकरीनिमित्ताने, रोजगारानिमित्ताने शहरात येतो, तेव्हा तो कुटुंबापासून दूर होतो. स्वाभाविक कौटुंबिक दडपण नाहीसे होते. मग तो आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी मोकळा असतो. शिवाय जवळ पैसाही असतो.

श्रीमती केनेडी यांचा लेख
मिरांडा केनेडी या महिलेचा वॉशिंग्टन पोस्टया सुप्रसिद्ध दैनिकात प्रकाशित झालेला लेख या दृष्टीने मोठा बोलका आहे, वाचनीय आहे. लेखाचे शीर्षक आहे 'Is India's Economic Boom a Threat to Women?' शीर्षकाचा सोपा अर्थ आहे, ‘भारताची आर्थिक संपन्नता, महिलांकरिता धोका आहे काय?’ लेखिकेने दिल्लीचेच उदाहरण घेतले आणि सांगितले की, देशात होणार्‍या महिलांवरील बलात्काराच्या घटनांपैकी २५ टक्के घटना दिल्ली शहरात घडत असतात. (हा लेख http://articles.washingtonpost.com/2013-01-04/opinions/36208910_1_new-delhi-delhi-residents-rural-migrants वर वाचता येईल.) याचा अर्थ शहरातच फक्त अशा घटना घडतात आणि ग्रामीण भागात घडत नाहीत, असा करण्याचा मूर्खपणा शहाणी माणसे करणार नाहीत, याविषयी माझी खात्री आहे. प्राध्यान्येन व्यपदेशा:म्हणजे प्रधानतेने नाव मिळत असते, असा एक संस्कृत भाषेत न्यायच आहे. त्यानुसार अर्थ घ्यावा. दि. ६ जानेवारीला प्रकाशित झालेल्या माझ्या भाष्यात ‘संपत्ती व संस्कृतीया विषयाची चर्चा आली आहे. तिची पुनरुक्ती येथे करीत नाही. एवढेच म्हणतो की, संपत्तीच्या वाढीबरोबर संस्कृती आली नाही, तर व्यसने, ऐष आराम आणि कामवासनेची तृप्ती करण्यासाठी अविचार व अत्याचार यांचेही प्रमाण वाढते. मोहनराव भागवतांनी, या संदर्भात धनसंपन्न इंडियाव संस्कृतिसंपन्न भारतअशी तुलना केली असावी, असे मला वाटते.

वैचारिक गोंधळ
इंदूरच्या भाषणावर, ते नीट समजून न घेता, अर्धवट वाचून, टीका झाली. संपूर्ण भाषण वाचल्यानंतर ज्यांनी घाईघाईने टीका केली, त्यांच्यापैकी काहींनी नंतर क्षमायाचनाही केली. श्री. मोहनराव म्हणाले, पाश्‍चात्त्यांमध्ये विवाह हा एक करार मानला जातो. हे चूक आहे काय? पण माध्यमांनी पाश्‍चात्त्यांमध्येहा किंवा अशाच अर्थाचा जो शब्द होता, तो गाळला आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. अर्धवटच वचन विचारात घेतले तर कसा गोंधळ होऊ शकतो, याचा एक काल्पनिक नमुना येथे देतो. मा. गो. वैद्य हा महामूर्ख माणूस आहे, असे जे म्हणतात ते बरोबर नाही.या वाक्यातील असे जे म्हणतात ते बरोबर नाहीएवढा अंश गाळला, तर मा. गो. वैद्य हा महामूर्ख माणूस आहेएवढेच ध्यानात घेतले जाईल की नाही? तसेच श्री मोहनरावांच्या बाबतीत झाले आहे. आपल्याकडे विवाह संस्कारमानला गेला आहे. संस्कारम्हणजे चांगले होण्याची, चांगले करण्याची व्यवस्था. विवाह हे व्रत आहे. करार म्हटला की, तो मोडता येतो. कराराच्या अटी असतात. त्या अटीतील एखादी अट मोडली किंवा मोडल्याचा आरोप केला, तर करार मोडता येतो. व्रतमोडता येत नाही. एकादशीच्या उपवासाचे व्रत असेल, आणि घरी आलूबोंडे तयार होत असतील, तर ते खाण्याचा मोह होऊ शकतो, पण व्रताची आठवण असेल, तर तो ते खाणार नाही. व्रतासाठी संयम लागतो. विवाहात उपभोग अभिप्रेत आहे. पण त्याला संयमाची साथ हवी. हा संयमच कामवासनेच्या तृप्तीला, धर्माला अविरोधी बनवील.

स्त्रीचा सन्मान
समाज चालायचा म्हणजे स्त्री-पुरुष संगम आलाच. काही थोडे लोक असतात की, जे कटाक्षाने विवाहसंस्थेपासून दूर राहतात. त्यांच्या पुढे दुसरे कोणते तरी भव्यदिव्य लक्ष्य असते. शुकासारखे, ज्ञानेश्‍वर-रामदासांसारखे अनेक थोर थोर महात्मे होऊन गेले, ज्यांनी विवाह केला नाही. संघाचे प्रचारकही, एखादा अपवाद सोडला तर, अविवाहितच असतात. पण त्यांची संख्या कमी असते. संघाच्या लक्षावधी स्वयंसेवकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांची संख्या दोन-अडीच हजारापेक्षा अधिक नसणार. अनेक महर्षी, मठाधिपतीही विवाहित असतात. अगस्त्य-लोपामुद्रा, वसिष्ठ-अरुंधती या पुराणकालीन जोड्या आहेत. काही देवही सपत्नीक आहेत. शंकर-पार्वती, विष्णू-लक्ष्मी दाम्पत्ये आहेत. आपल्याकडे दोन्ही नावांचा समास करून व्यक्तींची नावे ठेवली जातात. पण आपल्या संस्कृतीचा आणि संस्कृत व्याकरणाचा नियम आहे की, प्रथम स्त्रीचे नाव आणि नंतर पुरुषाचे. म्हणून उमाशंकर, लक्ष्मीनारायण, सीताराम, राधाकृष्ण- अशी नावे आहेत. मनुस्मृतीच्या लेखकाला प्रतिगामी म्हणून खूप झोडले जाते. पण त्यानेही यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:असे लिहून ठेवले आहे. जेथे महिलांचा आदर होतो, तेथे देवता आनंदाने राहतात, असा या वाक्याचा अर्थ आहे. मनुस्मृतीतील न स्त्री स्वातन्त्र्यमर्हतिया वचनावरून त्याची निंदा केली जाते. पण ही निंदा करणारे त्या पंक्तीच्या अगोदरच्या पंक्ती ध्यानातच घेत नाहीत. संपूर्ण श्‍लोकाचा अर्थ आहे बाल्यकाळी पित्याने, तारुण्यात पतीने, वृद्धापकाळात मुलांनी स्त्रीचे रक्षण करावे. तिला वार्‍यावर सोडून देऊ नये.

संपृक्त जोडी
पती आणि पत्नी संसाररथाची दोन चाके आहेत, हे तर अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. रथाची गती नीट व सुरळीत असण्यासाठी दोन्ही चाकांची उंची व शक्ती समान असली पाहिजे. महाकवी कालिदासाने, रघुवंशाच्या प्रारंभी शिव-पार्वतीला वंदन करताना शब्द आणि अर्थ यांच्याप्रमाणे परस्परांत संपृक्त’ (एकजीव झालेले) असे वर्णन केले आहे. (वागर्थाविव संपृक्तौ). शब्दाशिवाय अर्थ राहू शकणार नाही; आणि अर्थाशिवाय शब्द म्हणजे निव्वळ आवाज. पतिपत्नीचे असे निरंतर परस्परावलंबी साहचार्य हिंदू संस्कृतीला अभिप्रेत आहे. म्हणून विवाहाला धार्मिक संस्कार मानलेले आहे. मोहनरावांनी, असे परस्पराशी जोडून घेणे, व्यक्तीने कुटुंबाशी, कुटुंबाने समाजाशी, समाजाने चराचर सृष्टीशी म्हणजे पर्यावरणाशी जोडून घेणे, हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. यात कुठला संकुचितपणा किंवा प्रतिगामीपणा आहे?
सांख्य तत्त्वज्ञानानेही प्रकृती आणि पुरुष ही दोन आदिम तत्त्वे सांगितली आहेत. प्रकृतीतूनच सर्व निर्मिती होते. पण त्यासाठी पुरुषाचीउपस्थिती आवश्यक असते. श्रीमद्भगवद्गीताही सांगते मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्’. पुरुष आणि प्रकृती दोन्ही अनादिआहेत. म्हणजेच ती दोन्ही अनंतहीआहेत. हिंदू संस्कृतीचा स्त्री-पुरुष संबंधात, असा मौलिक, अनादि, अनंत, म्हणजेच सनातन दृष्टिकोण आहे.

शाश्‍वत आणि युगानुसारी
हे शाश्‍वत तत्त्व आहे. ते कायम ठेवून युगानुसार परिवर्तनाला येथे वाव आहे. उदाहरणच द्यावयाचे झाले, तर आपले कपड्यांचे देता येईल. माणसाने, त्यात स्त्रियाही आल्या, वस्त्र परिधान करणे, हे शाश्‍वत तत्त्व आहे. पशू वस्त्र परिधान करीत नाहीत. वस्त्राचा उद्देशच जे झाकायचे ते झाकले गेले पाहिजे हा आहे. हे शाश्‍वत तत्त्व आहे. ते झाकणार्‍या वस्त्राचा आकारप्रकार कालानुसार बदलेल. नववारी जाईल, पाचवारी येईल, मग सलवारकमीज येईल, नंतर जीन्स व शर्टही येतील. पण शाश्‍वत उद्दिष्टाचे भान नित्य कायम असले पाहिजे. हिंदूंनी नेहमीच या शाश्‍वत व युगानुसारी तत्त्वाचा अर्थ समजून घेतला आणि शाश्‍वत कायम ठेवून युगानुकूल बदल केला, म्हणून तो समाज अजून जिवंत आहे. वस्त्रावरून आठवले की तो सभ्य असला पाहिजे. सभ्यम्हणजे सभेत बसण्यालायक; आणि सभा एक-दोघांची नसते. तेथे सामूहिक उपस्थिती असते. त्या उपस्थितीला साजेसा आपला पोशाख असला पाहिजे. आधुनिकतेचा भलताच सोस घेतलेल्यांनी या दृष्टीने आपल्या पोशाखाचा विचार करावा. तो सभ्यता व संस्कृतीला अभिव्यक्त करणारा असावा. अंगाचा नको तो भाग प्रदर्शित करण्यासाठी त्याचा वापर नसावा. हेच आपल्या संस्कृतीचे संक्षेपाने कथन आहे. आधुनिकतेने संस्कृतीशी वैर घेण्याचे कारण नाही.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ११-०१-२०१३
babujivaidya@gmail.com

12 comments:

  1. आदरणीय
    वैद्य बाबा ..
    सादर प्रणाम ...
    आपल्या माध्यमांचा खप वाढविने एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही विधानांची तोड़फोड़ करुन जनते समोर मांडने हे कार्य काही लोकांनी चालविल्याचे दिसत आहे .
    अशावेळी संस्कृति अथवा संस्कार जपने त्यांना कसे जमेल ....
    कारण विडम्बन हाच त्यांचा मूळ उद्देश आहे असे दिसून येते .
    सरसंघचालक जे बोलले ते पूर्ण न ऐकता त्याचा विपर्यास करने हे काम फ़क्त यावेळी केले गेले .
    उशिरा का होईना काही शुद्धिवर येण्याचा प्रयत्न करित आहेत हे ऐकून बरे वाटले .
    विस्तृत लेख आवडला .
    ------------
    महेशचंद खत्री
    कळंबेश्वर
    तालुका - मेहकर
    विदर्भ

    ReplyDelete
  2. They always try to "read"between lines

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

    Saturday, November 26, 2011
    कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?
    गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे."

    ReplyDelete
  4. खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?

    ReplyDelete
  5. मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.

    त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे.
    ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.

    त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

    ReplyDelete
  6. मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?

    भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.

    पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.

    ReplyDelete
  7. म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
    मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.
    पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.

    ReplyDelete
  8. श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.

    ReplyDelete
  9. The name India may refer to either the region of Greater India (the Indian subcontinent) or to the contemporary Republic of India located therein. The name is derived from the name of the Indus, or Sindhu, River and has been in use in Greek since Herodotus (4th century BC). The term appeared in Old English as early the 9th century and reemerged in Modern English in the 17th century.

    According to the Manusmṛti (2.21–22) North India (i.e., India north of the Vindhyas) is also known as Āryāvarta (Sanskrit: आर्यावर्त, "abode of the Aryans).[1]

    The English term is from Greek Ἰνδία (Indía), via Latin India. Indía in Koine Greek denoted the region of the Indus ("Ἰνδός") river in Pakistan, since Herodotus (5th century BC) ἡ Ἰνδική χώρη, hē Indikē chōrē; "Indian land", Ἰνδός, Indos, "an Indian", from Old Persian (referring to what is now known as Sindh, a province of present day Pakistan, and listed as a conquered territory by Darius I in the Persepolis terrace inscription). The name is derived ultimately from Sindhu, the Sanskrit name of the river, but also meaning "river" generically. Latin India is used by Lucian (2nd century).

    The name India was known in Old English, and was used in King Alfred's translation of Orosius. In Middle English, the name was, under French influence, replaced by Ynde or Inde, which entered Early Modern English as Indie. The name India then came back to English usage from the 17th century onwards, and may be due to the influence of Latin, or Spanish or Portuguese.

    Sanskrit indu "drop (of Soma)", also a term for the Moon, is unrelated, but has sometimes been erroneously connected, listed by, among others, Colonel James Todd in his Annals of Rajputana. Todd describes ancient India as under control of tribes claiming descent from the Moon, or "Indu" (referring to Chandravanshi Rajputs).

    ReplyDelete
  10. The name Bhārata (/bˈhɑːrəθ/) (भारत) has been used as a self-ascribed name by people of the Indian Subcontinent and the Republic of India.[2] Bhārata is the official Sanskrit name of the country, Bhārata Gaṇarājya, and the name is derived from the ancient Indian texts, that which refers to the land that comprises India as Bhārata varṣam, and uses this term to distinguish it from other varṣas or continents.[3] For example, the Vayu Puranas says he who conquers the whole of Bharata-varsa is celebrated as a samrāt (Vayu Purana 45, 86).[3] However in some puranas, the term 'Bharate' refers to the whole Earth as Emperor Bharata is said to have ruled the whole Earth. Until the death of Maharaja Parikshit, the last formidable emperor of the Kuru dynasty, the known world was known as Bharata varsha.[citation needed]

    According to the most popular theory the name Bhārata is the vrddhi of Bharata, a king mentioned in Rigveda.

    The Sanskrit word bhārata is a vrddhi derivation of bharata, which was originally an epithet of Agni. The term is a verbal noun of the Sanskrit root bhr-, "to bear / to carry", with a literal meaning of "to be maintained" (of fire). The root bhr is cognate with the English verb to bear and Latin ferō. This term also means "one who is engaged in search for knowledge".

    According to the Puranas(Gita), this country is known as Bharatavarsha after the king Bharata Chakravarti. This has been mentioned in Vishnu Purana (2,1,31), Vayu Purana,(33,52), Linga Purana(1,47,23), Brahmanda Purana (14,5,62), Agni Purana ( 107,11–12), Skanda Purana, Khanda (37,57) and Markandaya Purana (50,41) it is clearly stated that this country is known as Bharata Varsha. Vishnu Purāna mentions:

    ऋषभो मरुदेव्याश्च ऋषभात भरतो भवेत्
    भरताद भारतं वर्षं, भरतात सुमतिस्त्वभूत्
    Rishabha was born to Marudevi, Bharata was born to Rishabh,
    Bharatavarsha (India) arose from Bharata, and Sumati arose from Bharata

    —Vishnu Purana (2,1,31)

    ततश्च भारतं वर्षमेतल्लोकेषुगीयते
    भरताय यत: पित्रा दत्तं प्रतिष्ठिता वनम (विष्णु पुराण, २,१,३२)
    This country is known as Bharatavarsha since the times the father entrusted the kingdom to the son Bharata and he himself went to the forest for ascetic practices [ Rishabha/ Rishabdev is First Trithankar (Teacher) of Jainism. He had two sons Bharat and Bahubali' ]

    —Vishnu Purana (2,1,32)

    The realm of Bharata is known as Bharātavarṣa in the Mahabhārata (the core portion of which is itself known as Bhārata) and later texts. The term varsa means a division of the earth, or a continent. [4] A version of the Bagavatha Purana says, the Name Bharatha is after Jata Bharatha who appears in the fifth canto of the Bagavatha.

    - Vishnu Purana (2.3.1)[4][5]

    uttaraṃ yatsamudrasya himādreścaiva dakṣiṇam
    varṣaṃ tadbhārataṃ nāma bhāratī yatra santatiḥ

    उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
    वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।
    "The country (varṣam) that lies north of the ocean and south of the snowy mountains is called Bhāratam; there dwell the descendants of Bharata."

    The term in Classical Sanskrit literature is taken to comprise the present day territories of Afghanistan, Pakistan, Republic of India, Nepal and Bangladesh. This corresponds to the approximate extent of the historical Maurya Empire under emperors Chandragupta Maurya and Ashoka the Great (4th to 3rd centuries BC). Later political entities unifying approximately the same region are the Mughal Empire (17th century), the Maratha Empire (18th century), and the British Raj (19th to 20th centuries).

    ReplyDelete
  11. MG Vaidya kicks up a new storm; says Muslims should willingly relinquish claim to land where Babri masjid stood
    Thursday, 3 April 2014 - 8:50am IST | Agency: DNA
    After the recent controversy over the BJP denying that its leadership had apologised to Muslims for any mistakes committed in the past, RSS ideologue and former chief editor of 'Tarun Bharat' MG Vaidya may have kicked off a fresh storm by saying that Muslims should have willingly relinquished claim in favour of Hindus over the land where the felled Babri masjid once stood.

    He also justified the demolition of the disputed structure in 1992, which he claimed represented "an invader's arrogance".

    While clarifying that he did not support the 2002 Gujarat riots, Vaidya, a former RSS spokesperson, said they were a "reaction" to the Sabarmati Express being burnt at Godhra. He described allegations of the Sangh being involved in acts of terrorism as a "conspiracy".

    Incidentally, the BJP and the RSS had distanced themselves from Vaidya's comments in 2012 suggesting that Gujarat chief minister Narendra Modi was responsible for the campaign against then BJP chief Nitin Gadkari. Keen observers of the RSS also point out that Vaidya does not hold any position in the BJP's ideological fountainhead.

    "The Babri was not a masjid, it was only a structure. Namaz was not being offered there... pictures of Gods and Goddesses were put up on walls," said Vaidya, a former member of the Maharashtra legislative council, while speaking to dna at his Nagpur residence, adding that idols of Ram Lalla had been found there in 1949 and that 'Shilapujan' for the temple had been approved by the Rajiv Gandhi government.

    "Muslims must themselves relinquish claim over it (and say that) a temple once stood there and was demolished to construct a masjid.... The Hindus... will praise them and give them separate land for the Masjid free of cost," said Vaidya, questioning why Mughal emperor Babar had erected the mosque there.

    "Good that it was demolished... why express sorrow on the demolition?...The structure symbolised an invader's arrogance," said Vaidya, claiming that excavations had proved that a temple had existed on the site.

    "Why did the 2002 riots occur? That was a reaction (to the Sabarmati Express' burning at Godhra)... However, no thought is given to this," said Vaidya, adding that "Narendrabhai's government should not be blamed as they brought the riots under control.

    "The only blame, if any, can be that they did not control the riots as soon as they should have," he said, adding that, however, this was not easy when the riots were a "spontaneous reaction".

    "I am not supporting the riots.... but putting it in the proper perspective," said Vaidya, adding that "had there been no Godhra, there would have been no Gujarat riots."

    He questioned why the Congress was not being held to account for the anti-Sikh riots in the aftermath of Indira Gandhi's assassination in 1984 and pointed out that Modi had been given a clean chit by the court-appointed special investigation team. Hence, a sense of closure to the issue was necessary.

    200 seats for BJP
    "The political atmosphere favours the BJP," said MG Vaidya, predicting that it would get over 200 seats, in addition to those won by its allies. Vaidya rejected contentions that Modi was an authoritarian leader and questioned that when Modi formed the cabinet, would it possible for just one man's writ to run in it? "Our country is not fit for dictatorship," he said, pointing to Indira Gandhi's authoritarian rule and declaration of the emergency. "Where there is an organisation, dictatorships cannot happen. The BJP has an organisation and this organisation has a chief (Rajnath Singh)," Vaidya said.
    Source: DNA

    ...and I am Sid Harth

    ReplyDelete
  12. Vaidya’s column missing from Tarun Bharat
    Written by Press Trust Of India | Nagpur | August 24, 2010 3:06 am
    The weekly column contributed by RSS ideologue M G alias Baburao Vaidya for the past 27 years in local Marathi daily Tarun Bharat has not appeared for the last three weeks.

    The column called “Bhashya” is missing since August 8,much to the surprise of readers and the Sangh Parivar fraternity who have always been keen to know his critical comments on the style of functioning of the BJP,its leaders and dilution of ideology.

    “I have not written the column as I do not want to embarrass the Marathi daily,” Vaidya told without elaborating further. He has been writing the column after he retired as the editor of Tarun Bharat at the age of 60.

    A former first spokesperson of RSS,Vaidya,however,said he has received a few calls after his column did not appear in the daily.

    Vaidya’s successor Sudhir Pathak said the RSS ideologue’s column has not been discontinued but also said that it has not appeared. “He has not sent the write-up to us,” Pathak added. “Maybe it appears next Sunday.” Pathak said.

    Copyright © 2014 The Indian Express ltd. All Rights Reserved

    ...and I am Sid Harth

    ReplyDelete